सर्वच ग्रामसभा स्वत:च करणार तेंदूसंकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:31+5:302021-03-29T04:22:31+5:30
बाॅक्स तेंदूपत्त्याला चांगला भाव मागील दाेन वर्षांमध्ये तेंदूपत्त्याला फारशी मागणी व भावही मिळत नव्हता. मागील वर्षी तर काही ग्रामसभांच्या ...

सर्वच ग्रामसभा स्वत:च करणार तेंदूसंकलन
बाॅक्स
तेंदूपत्त्याला चांगला भाव
मागील दाेन वर्षांमध्ये तेंदूपत्त्याला फारशी मागणी व भावही मिळत नव्हता. मागील वर्षी तर काही ग्रामसभांच्या लिलावाला ठेकेदार पाेहाेचले नाही. त्यामुळे तेंदूपत्त्यापासून रूपयाचेही उत्पन्न मिळाले नाही. वनविभागाच्या युनिटलाही फार कमी भाव मिळाला हाेता. त्यामुळे ग्रामसभांचे माेठे नुकसान झाले हाेते. यावर्षी मात्र तेंदूपत्त्याला चांगला भाव व मागणी आहे. काही गावांमध्ये तेंदूपत्त्याचा दर जवळपास १० हजार रूपये प्रती स्टँडर्ड बॅग पर्यंत पाेहाेचला आहे. बहुतांश गावांच्या लिलावाची प्रक्रिया आटाेपली आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्त्यापासून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.
बाॅक्स
वनविभागाचे सर्वच युनिट विकले
पेसा गावांचे क्षेत्र वगळता वनविभागाकडे असलेल्या काही जंगलात तेंदूपत्त्याचे उत्पादन हाेते. यावर्षी ही सर्वच युनिट विकण्यात आली आहेत. विशेष म्हणजे लिलावाच्या पहिल्याच फेरीत सर्वच युनिट विकण्यात आली आहेत. त्यामुळे वनविभागालाही चांगले उत्पन्न मिळणार आहे.