आरोग्य केंद्रात सर्व कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:47 IST2019-06-24T22:47:07+5:302019-06-24T22:47:20+5:30
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अजय कंकडालवार यांनी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अहेरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव आरोग्य केंद्राला भेट दिली असता, येथे एकही कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले नाही. दरम्यान वैैद्यकीय अधिकारी डॉ. उईके ह्या वेळेवर सदर आरोग्य केंद्रात पोहोचल्या.

आरोग्य केंद्रात सर्व कर्मचारी गैरहजर
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अजय कंकडालवार यांनी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अहेरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव आरोग्य केंद्राला भेट दिली असता, येथे एकही कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले नाही. दरम्यान वैैद्यकीय अधिकारी डॉ. उईके ह्या वेळेवर सदर आरोग्य केंद्रात पोहोचल्या.
सदर प्राथमिक आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक मशीन बंद असून कोणतेही कर्मचारी वेळेवर कर्तव्यावर येत नाही. कर्मचाऱ्यांवर कोणत्याही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. गावातील नागरिकांनी यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या. मात्र कर्मचाºयांवर कोणताही परिणाम झाला नाही. या सर्व गंभीर बाबीची दखल घेऊन कर्मचाºयांनी नियमित उपस्थित राहून आरोग्य सेवा देण्याचे निर्देश जि. प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी अधिनस्त अधिकाºयांना दिले.
लाखो रूपये खर्च करून शासनाने महागाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारत बांधली. या आरोग्य केंद्रात जवळपास २५ ते ३० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनतेच्या सेवेपोटी सदर कर्मचारी महिन्याला वेतन घेतात. मात्र त्याचा कोणताही फायदा महागाव परिसरातील नागरिक व रूग्णांना मिळत नसल्याचे विदारक वास्तव जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान उजेडात आले. आरोग्य सेवेत कामचुकारपणा व हयगय मुळीच खपवून घेणार नाही, असा इशारा उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दिला. यावेळी कार्यकर्ते हजर होते.