अडीच लाख रुपयांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:52+5:30
देसाईगंजवरून आरमोरी मार्गे टाटासुमो वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार देसाईगंज टी पॉर्इंट जवळ सापळा रचून वाहन थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४० बॉक्स आढळून आले. त्यामध्ये एकूण ४ हजार दारूच्या निपा आढळल्या. तसेच एमएच ४० ए ६७८९ क्रमांकाचे वाहन सुध्दा जप्त केले.

अडीच लाख रुपयांची दारू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी पोलिसांनी सापळा रचून २ लाख ४० हजार रुपये किमीची दारू व तीन लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सदर कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.
देसाईगंजवरून आरमोरी मार्गे टाटासुमो वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार देसाईगंज टी पॉर्इंट जवळ सापळा रचून वाहन थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४० बॉक्स आढळून आले. त्यामध्ये एकूण ४ हजार दारूच्या निपा आढळल्या. तसेच एमएच ४० ए ६७८९ क्रमांकाचे वाहन सुध्दा जप्त केले. दिनेश जीवलाल बिसेन (३१) रा. कस्तुरबा वार्ड देसाईगंज याला अटक केली असून व्यंकटेश ताडपल्लीवार याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर कारवाई पोलीस निरिक्षक दिगांबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरिक्षक पंकज बोडसे, पोलीस हवालदार गलबले, पोलीस नाईक नरेश वासेकर, अकबर पोयाम यांच्या पथकाने केली.