शिवराजपूरात दारू व मोहसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:38 IST2021-03-17T04:38:05+5:302021-03-17T04:38:05+5:30
देसाईगंज : तालुक्यातील शिवराजपूर येथील दारूविक्रेत्यांविरोधात गाव संघटन, पोलीस पाटील व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या अहिंसक कृती केली ...

शिवराजपूरात दारू व मोहसडवा नष्ट
देसाईगंज : तालुक्यातील शिवराजपूर येथील दारूविक्रेत्यांविरोधात गाव संघटन, पोलीस पाटील व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या अहिंसक कृती केली . यावेळी १०० टिल्लू देशी दारू, ७० किलो मोहसडवा व ७ लिटर मोहफुलाची दारू नष्ट करण्यात आली आहे.
तालुक्यातील शिवराजपूर येथे अवैध दारूविक्री केल्या जाते. गावातील जवळपास सहा घरी दारूची विक्री केल्या जाते. यामुळे दारूविक्री बंद असलेल्या गावातील मद्यपी लाेक या गावात येतात. परिणामी भांडण,तंट्यात वाढ झाली आहे. परिसरातील गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मुक्तीपथ तालुका चमू, पोलीस पाटील व गाव संघटनेने अहिंसक कृती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार गावातील सहा दारूविक्रेत्यांच्या घरी जाऊन पाहणी करण्यात आली. दरम्यान विविध ठिकाणी ५ हजार रुपये किंमतीची देशी दारू, ७० किलो मोहसडवा, सात लिटर मोहफुलाची दारू नष्ट करण्यात आली. या कृतीमुळे गावातील व परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाव संघटन अध्यक्ष मुन्ना ठाकरे, पोलिस पाटील दर्वे, गावसंघटन सदस्य व मुक्तीपथ तालुका चमू यांच्या सहकार्याने ही अहिंसक कृती करण्यात आली.