सोमवारी सकाळी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अकाली पावसाने काढणीला आलेले लाखोळीचे पीक पूर्णत: भिजले. त्यामुळे लाखोळीचे दाणे काळे पडण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली असून देसाईगंज तालुक्यात दोन दिवसांपूर्वीही पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक शेतात पडून असलेली लाखोळी जीर्ण अवस्थेत आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून जिल्ह्याच्या काही भागात भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
अकाली पावसाने लाखोळीसह भाजीपाल्याला फटका
By admin | Updated: March 1, 2016 00:57 IST