वेलगूर येथे पोलीस विभागातर्फे कृषी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST2021-07-17T04:28:19+5:302021-07-17T04:28:19+5:30
यावेळी कृषी अधिकारी कांबळे, मंडळ अधिकारी खरात, मेश्राम कृषी सहायक मेश्राम, आलापल्लीचे सहायक वनसंरक्षक देवगडे, तलाठी इब्राहिम शेख, ...

वेलगूर येथे पोलीस विभागातर्फे कृषी मेळावा
यावेळी कृषी अधिकारी कांबळे, मंडळ अधिकारी खरात, मेश्राम कृषी सहायक मेश्राम, आलापल्लीचे सहायक वनसंरक्षक देवगडे, तलाठी इब्राहिम शेख, मंडळ अधिकारी राजू सिडाम, पं.स. उपसभापती गीता चालुरकर, बोटलाचेरू, नवेगांव, किष्टापूर येथील पोलीस पाटील व परिसरातील शेतकरी बांधव, मुख्याध्यापक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. विभाग प्रमुखांनी उपस्थित नागरिकांना विभागामार्फत येणाऱ्या शासकीय योजनेबाबत मार्गदर्शन करून, शासकीय कागदपत्रांबाबतचे महत्त्व पटवून त्याचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. गरजू शेतकऱ्यांना धान, मका, चवडी, टोमॅटो आदींचे बियाणे, तसेच फावळा, घमेला, टॉर्च व विविध प्रकारचे झाडांचे रोप वाटप करण्यात आले. नवेगांव येथील युवकांना हॉलीबॉल व नेट वाटप करण्यात आले, तसेच अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात प्रोजेक्ट प्रगती व प्रोजेक्ट विकास कार्यक्रमांतर्गत पोस्टे अहेरीकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनेची माहिती, त्यामध्ये ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजना, कास्ट सर्टिफिकेटसाठी लागणारी कागदपत्रे आदीविषयी माहिती देण्यात आली, तसेच बाल संगोपन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, वृद्धांकरिता पेन्शन योजना, युवक/युवतींकरिता हॉटेल मॅनेजमेंट कोर्स, नर्सिंग कोर्स, टेलरिंग, पोल्ट्री फार्म, फोटोग्राफी प्रशिक्षण आदी विविध योजनांची माहिती देण्यात आली. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्यासह पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
160721\img_20210716_101747.jpg
साहित्याचे वाटप करतांना पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे