अगरबत्ती प्रकल्पात समन्वयकाकडून महिलांना मजुरीत फटका

By Admin | Updated: April 10, 2016 01:36 IST2016-04-10T01:36:11+5:302016-04-10T01:36:11+5:30

गडचिरोली येथे कार्यरत असताना तत्कालीन मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या कुरखेडा येथील अगरबत्ती प्रकल्पात .....

Agarbatti project coordinates women's labor woes | अगरबत्ती प्रकल्पात समन्वयकाकडून महिलांना मजुरीत फटका

अगरबत्ती प्रकल्पात समन्वयकाकडून महिलांना मजुरीत फटका

महिलांची तक्रार : कलेक्टर व मुख्य वनसंरक्षकांना विचारा
कुरखेडा : गडचिरोली येथे कार्यरत असताना तत्कालीन मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या कुरखेडा येथील अगरबत्ती प्रकल्पात काम करणाऱ्या महिला मजुरांना समन्वयकाकडून मजुरी वितरित करण्यात प्रचंड त्रास दिला जात असल्याची तक्रार महिलांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे ७ एप्रिल २०१६ रोजी केली आहे.
कुरखेडा येथे मागील दीड वर्षांपासून वन कार्यालयाच्या माध्यमातून अगरबत्ती प्रकल्प (जीएपी) अंतर्गत सुरू आहे. येथे सध्या १८ महिला काम करीत आहेत. महिलांना २१.५० रूपये प्रती किलो या प्रमाणे अगरबत्ती तयार करण्याचा मोबदला देण्याचे ठरले आहे. त्यापैकी महिलांना १८ रूपये प्रती किलो प्रमाणे मजुरी स्वरूपात देऊन उर्वरित ३.५० रूपये सुपरवायझर यांना दिले जाते. महिन्याकाठी महिलांना सरासरी १७०० रूपये महिना मिळतो व सुपरवायझरला २३०० रूपये महिना मिळतो. ही मजुरी तुटपुंजी आहे. परंतु याव्यतीरिक्त मजुरीतून वेळोवेळी पैसे कपात करण्यात येतात. ही कपात कशाची याबद्दल जीएपीचे समन्वयक विनयकुमार यांना विचारणा केली, तर ते ‘वो मुझे पता नही, आप इसके बारे में कलेक्टर को पुछो या डीएफओ को पुछो’ असे उत्तर देतात.
जानेवारी २०१६ च्या पेमेंटमधून अशाच प्रकारे १९०७ रूपये कपात करण्यात आले होते. अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल वेळेवर पुरवठा होत नाही. त्यामुळे अगरबत्ती सेंटर बंद राहते. त्यामुळे महिला रिकाम्या बसून राहतात. याचा देखील मजुरीवर मोठा परिणाम होत असतो. तेव्हा कच्चा माल वेळेवर पुरवठा करण्याची व्यवस्था व्हावी, अशी विनंतीही महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जे काही आदेश कामासंबंधी देण्यात येतात. ते तोंडी न देता लेखी स्वरूपात देण्यात यावे, असेही महिलांनी म्हटले आहे. बरेच वेळा एकदा एक आणि दुसऱ्यांदा एक बाब सांगण्यात येत असते. येथे काम करणाऱ्या महिलांना १७०० ते १८०० रूपये प्रती महिना मजुरी मिळते. रोजगार हमी योजनेची मजुरी प्रती दिवस १८१ रूपये आहे. तेव्हा या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना रोहयो इतकी मजुरी मिळत नाही. कमीत कमी १५० रूपये मजुरी मिळायला पाहिजे, अशी मागणीही या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर महिलांच्या शिष्टमंडळाने कुरखेडा नगर पंचायतीच्या आरोग्य सभापती आशाताई जगदिश तुलावी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार भंडारी यांना निवेदन दिले.

Web Title: Agarbatti project coordinates women's labor woes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.