कोंबड्याची शिकार करून अजगर पोहचला थेट पोलिस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2023 20:00 IST2023-07-07T20:00:19+5:302023-07-07T20:00:49+5:30
Gadchiroli News आठ फूट लांबीचा एक अजगर कोंबड्याची शिकार करून पोलिस ठाण्यात पोहोचला. जणू त्याने गुन्ह्याची कबुलीच दिली.

कोंबड्याची शिकार करून अजगर पोहचला थेट पोलिस ठाण्यात
गडचिरोली : आठ फूट लांबीचा एक अजगर कोंबड्याची शिकार करून पोलिस ठाण्यात पोहोचला. जणू त्याने गुन्ह्याची कबुलीच दिली. या अजगराने नंतर पोटातील कोंबडा तोंडातून बाहेर काढला, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिरोंचा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील दुर्गम भागातील पोतागुड्डम पोलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला.
सिरोंचापासून सात किलोमीटरवर पोतागुड्डम गाव आहे. या गावातील पोलिस ठाण्याच्या आवारात अजगराने प्रवेश केला तेव्हा त्याचे पोट सुजलेले होते, त्यामुळे त्याला नीट सरपटता येत नव्हते, त्याच्यातील स्थूलपणा पाहून त्याने काही तरी गिळल्याचे दिसत होते. आठ फूट लांबीच्या या अजगराने काही वेळात पोटातील कोंबडा हळूहळू पुढे सरकवत तोंडातून बाहेर काढला. हा कोंबडा मृतावस्थेत होता. यानंतर पोलिस अंमलदार गौतम गवई यांनी अजगराला सुरक्षित जंगलात सोडले. पोतागुड्डम गावाजवळून इंद्रावती नदी वाहते, तेथे वन्यजीवांसह जलचर प्राणी नेहमीच आढळतात; पण, अजगर थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याच्या चर्चेमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.