महापुरुषांना अभिवादन करून ते चढले बाेहल्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST2022-05-01T05:00:00+5:302022-05-01T05:00:29+5:30
पाथरगोटा येथील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. यादव राऊत यांच्या मुलीचे लग्न २७ एप्रिल रोजी पार पडले. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार अंगीकारून महापुरुषांच्या कार्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी याेगदान दिले. मुलीच्या लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान देण्यात आले.

महापुरुषांना अभिवादन करून ते चढले बाेहल्यावर
लाेकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : समाजसुधारकांच्या वैचारिक चळवळीत काम करणाऱ्या पित्याच्या कन्येच्या लग्न समारंभात फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्यावतीने वधू पित्याचा सत्कार करण्यात आला. विशेष या लग्नात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करूनच वर-वधू बाेहल्यावर चढले. त्यानंतर हिंदू विवाह पद्धतीनुसार मंगलाष्टके म्हणून विवाह पार पाडण्यात आला.
पाथरगोटा येथील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. यादव राऊत यांच्या मुलीचे लग्न २७ एप्रिल रोजी पार पडले. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार अंगीकारून महापुरुषांच्या कार्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी याेगदान दिले. मुलीच्या लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान देण्यात आले. बाेहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वरांना महात्म्याच्या प्रतिमांना दीप प्रज्वलित करून अभिवादन करूनच लग्न मंगलाष्टके म्हणण्यात आले. हिंदू विवाह पद्धतीच्या लग्नात भारतीय थोर पुढाऱ्यांच्या प्रतिमांची भर पडल्यामुळे सायंकाळच्या शांततापूर्ण वातावरणातून विवाह सोहळ्यात आणखीनच आनंदाची भर पडली.
शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाच्यावतीने या लग्नसमारंभात वधू पित्याचा शाल, सन्मानचिन्ह, शिवाजी व सम्राट अशोकाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वर-वधू कडील हजारो वऱ्हाडी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ घुटके, भीमराव मेश्राम, दिलीप घोडाम आदींनी सत्कार केला.
वऱ्हाड्यांची हजेरी
सदर लग्नसाेहळ्यात वऱ्हाडी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. काेराेना संकट दूर झाल्याने शासन व प्रशासनाच्या वतीने निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे आता दूरवरचे वऱ्हाडी लग्नाला हजेरी लावत आहेत. पाथरगाेटा येथील लग्नसमारंभात उपवर-वधूंसह सर्वांनिच महापुरूषांना अभिवादन केले. या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे.