जाहिरात होर्डिंग्ज झाकले

By Admin | Updated: September 4, 2014 23:44 IST2014-09-04T23:44:43+5:302014-09-04T23:44:43+5:30

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राज्यातील काँग्रेस, राकाँ आघाडी सरकारने लोकाभिमुख कामांची प्रसिद्धी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिराती करण्यास सुरूवात केली आहे. मात्र गडचिरोली जिल्हा

Advertisement covered hoardings | जाहिरात होर्डिंग्ज झाकले

जाहिरात होर्डिंग्ज झाकले

आचारसंहितेपूर्वीच : सरकारी योजनांची जनजागृती करणारे
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राज्यातील काँग्रेस, राकाँ आघाडी सरकारने लोकाभिमुख कामांची प्रसिद्धी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिराती करण्यास सुरूवात केली आहे. मात्र गडचिरोली जिल्हा मुख्यालयात लावण्यात आलेल्या सरकारी जाहिरातीच्या होर्डीग्जवर पांढरा कापड लावून त्या झाकण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया व अन्य साधनांचा वापर करीत मोठ्या प्रमाणावर मार्केटींग केले होते. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. त्यांचाच कित्ता गिरवत सध्या राज्यातील आघाडी सरकारने आपल्याही कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा प्रचार सुरू केला आहे. बसस्थानक व गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर होर्डींग्ज लावण्यात आल्या आहेत. गडचिरोली या मागास जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयाच्या बसस्थानकावर अशा जाहिराती लावण्यात आल्या होत्या. अद्याप विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली नाही. मात्र सदर जाहिरात फलकावर पांढरे कापड टाकून त्या झाकून टाकण्यात आल्या आहे.
याप्रकारामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आमचे सरकार असून आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिराती का झाकण्यात आल्या, याची विचारणा ते प्रशासनाला करू लागले आहे. असा प्रकार कसा काय झाला, अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव समशेर पठाण यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.
शहरात मनोधैर्य योजना, जलसंधारण विभाग, वन विभागाचा तेंदूपत्ता बोनस वितरण आदीबाबतच्या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. बसस्थानकावरील या जाहिराती मागील आठवडाभरापासून झाकण्यात आल्या आहेत. या संदर्भात प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांना विचारणा केली असता, शासनाच्या जाहिराती या सरकारी मालकीच्या होर्डिंग्जवर लावण्यात आल्या आहेत. मात्र मोक्याच्या व सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी काही जाहिराती या खासगी कंपनीच्या होर्डिंग्जवर लावण्यात आल्या असाव्यात व त्या काही मुदतीसाठीच असाव्यात. त्यामुळे झाकल्या गेल्याचा प्रकार घडला असेल, असे ते म्हणाले.
मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच गडचिरोली बसस्थानकावर चार होर्डिंग्ज सरकारी जाहिरातीचे झाकण्यात आले आहे. या प्रकारामुळे काँग्र्रेस पक्षाचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Advertisement covered hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.