धान उत्पादन वाढीसाठी पट्टा पद्धतीचा अवलंब करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:51+5:302021-07-15T04:25:51+5:30
देसाईगंज तालुका कृषी कार्यालयातर्फे शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले जात आहे. चिखली रिठ येथील कृषी पर्यवेक्षिका दुर्गा कोडापे ...

धान उत्पादन वाढीसाठी पट्टा पद्धतीचा अवलंब करा
देसाईगंज तालुका कृषी कार्यालयातर्फे शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले जात आहे. चिखली रिठ येथील कृषी पर्यवेक्षिका दुर्गा कोडापे यांनी पुरुषोत्तम प्रधान यांच्या शेतात धान पिकाची रोवणी करताना पट्टा पद्धतीचा अवलंब केला. पट्टा पद्धतीने रोवणी करताना रोप पूर्व-पश्चिम पद्धतीने रोवणी करावी. बारीक धानाची रोवणी २५ बाय २५ से.मी. अंतरावर , तर जाड धानाची रोवणी २० बाय २० से.मी. अंतरावर करावी. सलग १० ओळींची रोवणी झाल्यावर ४० से.मी. अंतराची ओळ सोडून रोवणी करावी. रोवणी करताना रोपांची संख्या दोन ते तीन एवढीच असावी. यामुळे फुटवे जास्त प्रमाणात येण्यास मदत होते. याशिवाय कीड नियंत्रणासाठी फवारणी करणे साेयीचे हाेते. या पद्धतीचा अवलंब केल्यास धान उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी पर्यवेक्षिका दुर्गा कोडापे यांनी केले.