निर्जंतुकीकरणाकडे प्रशासनाची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:47+5:302021-04-24T04:36:47+5:30
चामोर्शी शहरात कोरोनाचे रुग्ण दररोज निघत असून, काही रुग्ण दगावले आहे. शहरातील दमट ओलसर वातावरण कोरोनाचे विषाणू अधिक काळ ...

निर्जंतुकीकरणाकडे प्रशासनाची पाठ
चामोर्शी शहरात कोरोनाचे रुग्ण दररोज निघत असून, काही रुग्ण दगावले आहे. शहरातील दमट ओलसर वातावरण कोरोनाचे विषाणू अधिक काळ टिकून राहतात, असे आरोग्य विभागामार्फत सांगितले जात आहे. त्यानुसार चामोर्शी शहरात कोंदट, दमट व ओलसर वातावरण दिसून येते. परंतु शहरातील नागरिकांचे आरोग्य कायम राखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करून सामाजिक जाणिवेच्या दृष्टीने प्रशासन काहीच करीत नाही अशी भावना लोकांमध्ये आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य नियोजन करून निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे. येथील नाल्यांची साफसफाई वेळेवर होत नसल्याने घाणीमुळे नाल्या तुंबून राहतात. रस्त्यावरील कचरा कधीतरी झाडाला जातो. शहरातील सर्व गल्लीबोळात ओलसर जागेसह दमट वातावरण पाहावयास मिळतो. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छता करणे गरजेचे आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी येथील उपविभागीय कार्यालय येथे कोरोनाबाबतची आढावा बैठक घेऊन या बैठकीमध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयासह शहरात निर्जंतुकीकरण करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. तरीपण प्रशासनाकडून कोणत्याही वाॅर्डात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आलेली नाही. फक्त काही मोजक्याच शासकीय कार्यालयामध्ये नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांकडून फवारणी पंपाद्वारे जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे व शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन शहरात वाढता कोरोना कहर जाणून निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशी मागणी चामोर्शी शहरवासीयांनी केली आहे.
याबाबत नगरपंचायतचे अभियंता निखिल कारेकर यांना विचारणा केली असता, फवारणीकरिता जंतुनाशक बोलाविण्यात आले असून, येत्या दाेन ते तीन दिवसात चामोर्शी शहरात निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
===Photopath===
230421\23gad_1_23042021_30.jpg
===Caption===
चामाेर्शी शहरातील नाल्या अशाप्रकारे गाळाने तुंबल्या आहेत.