चर्चा झाली : शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते निर्देशचामोर्शी : जिल्हा परिषद प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळांमधील विविध मागण्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात तालुका तसेच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने गटशिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. चामोर्शी तालुका शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात चर्चा केली होती. अखेर शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापतींनी दखल घेत चामोर्शीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षकांच्या मागण्यांवर तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश पत्रान्वये दिले.चामोर्शीचे गटशिक्षणाधिकारी यांनी १६ आॅगस्ट रोजी पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. या बैठकीत आमगाव व चामोर्शी केंद्रातील शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा करणे, रजा, प्रवास देयके मंजूर करून तत्काळ निकाली काढणे, उन्हाळ्याच्या सुटीत मतदान केंद्राधिकारी म्हणून काम केलेल्या तसेच प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांचा प्रोत्साहन व वाहन भत्ता तत्काळ निकाली काढणे, प्रशासकीय बदली प्रवास भत्ता देयके त्वरित काढणे आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी चामोर्शी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांच्या मागण्यांची प्रशासनाकडून दखल
By admin | Updated: August 25, 2014 23:59 IST