निराधारांनाे अतिरिक्त नव्हे, हे तर मे महिन्याचे ॲडव्हांस अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST2021-05-08T04:38:43+5:302021-05-08T04:38:43+5:30
संचारबंदीच्या कालावधीत सर्वच व्यवहार ठप्प राहतात. या कालावधीत निराधारांची पैशाअभावी परवड हाेण्याची शक्यता असल्याने मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये निराधार नागरिकांना ...

निराधारांनाे अतिरिक्त नव्हे, हे तर मे महिन्याचे ॲडव्हांस अनुदान
संचारबंदीच्या कालावधीत सर्वच व्यवहार ठप्प राहतात. या कालावधीत निराधारांची पैशाअभावी परवड हाेण्याची शक्यता असल्याने मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये निराधार नागरिकांना एका महिन्याचे अतिरिक्त अनुदान शासनाकडून देण्यात आले हाेते. काेराेनाची दुसरी लाट सुरू झाल्याने यावर्षीही राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामध्ये निराधार, फेरीवाले, रिक्षाचालक, बांधकाम कामगार यांच्यासाठी आर्थिक मदतीच्या काही घाेषणा केल्या आहेत. त्यामुळे मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही एका महिन्याचे अतिरिक्त अनुदान मिळेल, अशी अपेक्षा निराधार नागरिक बाळगून हाेते; मात्र शासन मे महिन्याचे ॲडव्हांस अनुदान एप्रिल महिन्यातच जमा करणार आहे. शासनाने निराधारांचा विचार करून त्यांनाही अतिरिक्त अनुदान देण्याची मागणी आहे.
बाॅक्स
तहसीलपर्यंत पाेहाेचला निधी
-शासनाकडून प्राप्त झालेला निधी जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर वितरित करण्यात आला आहे. आता हा निधी बँकेत पाठविला जाणार आहे. बँकेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल.
- एका बँकेत १०० निराधार नागरिकांचे खाते असेल तर तेवढ्या निराधारांच्या अनुदानाचा एकच धनादेश बँकेत तहसीलमार्फत जमा केला जाते. प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची जबाबदारी बँक प्रशासनाची आहे; मात्र बँकेमार्फत रक्कम जमा करण्यास विलंब केला जातो व निराधार नागरिकांची ओरड सुरू हाेते.
काेट
मागील वर्षी केंद्र शासनाने एक महिन्याचे अतिरिक्त अनुदान दिले हाेते. यावर्षी राज्य सरकार देईल, अशी अपेक्षा हाेती; मात्र अतिरिक्त देणार नसल्याची माहिती आहे. दाेन महिन्यांचे एकाच वेळी अनुदान जमा केल्याने काहीच फायदा नाही. अतिरिक्त अनुदान देण्याची गरज आहे.
शिवराम बन्साेड, लाभार्थी.
काेट
राज्य शासन निराधार व वयाेवृद्ध नागरिकांबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. एप्रिल व मे महिन्याचे अनुदान आताच जमा करणार आहे. मग जून महिन्यात उपाशी राहायचे काय? याचा विचार शासनाने करण्याची गरज आहे.
आडकू कुळमेथे, लाभार्थी.
काेट
निराधार नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण हाेतील, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी शासनाने उचलण्याची गरज आहे. अनावश्यक कामांवर शासनाचे काेट्यवधी रुपये खर्च हाेतात; मात्र निराधारांना देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत. शासन केवळ घाेषणा करण्याचे काम करते. प्रत्यक्षात मात्र काहीच देत नाही.
वारलू शिंगाडे, लाभार्थी.
संजय गांधी निराधार याेजना-२३,४५१
श्रावणबाळ निराधार याेजना-६६,५३६
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन याेजना-३६,३६७
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन याेजना-२,९५१
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन याेजना-४३५