आसरअल्लीत आरोग्य समस्या तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST2019-10-31T06:00:00+5:302019-10-31T06:00:21+5:30
असरअल्ली येथील आरोग्य पथकात गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पद रिक्त आहे. तसेच आरोग्य सेविका दोन, आरोग्य सेवक एक व परिचराचे दोन अशी सहा पदे रिक्त आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन सरपंच वैशाली सिडाम यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (पथक) ला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. आसरअल्ली ग्रामस्थांच्या वतीने सरपंच व सचिवांना वैद्यकीय अधिकारी नियुक्तीसाठी ठराव देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

आसरअल्लीत आरोग्य समस्या तीव्र
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या असरअल्ली येथील प्राथमिक आरोग्य पथकात गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे असरअल्ली व अंकिसा परिसरात शासकीय आरोग्य सेवेची समस्या तीव्र झाली आहे. परिणामी रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत.
असरअल्ली येथील आरोग्य पथकात गट ब च्या वैद्यकीय अधिकाºयांचे एक पद रिक्त आहे. तसेच आरोग्य सेविका दोन, आरोग्य सेवक एक व परिचराचे दोन अशी सहा पदे रिक्त आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन सरपंच वैशाली सिडाम यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (पथक) ला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. आसरअल्ली ग्रामस्थांच्या वतीने सरपंच व सचिवांना वैद्यकीय अधिकारी नियुक्तीसाठी ठराव देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, आसरअल्ली गावाची लोकसंख्या पाच हजारांवर असून आजुबाजूला अनेक खेडेगाव आहेत. शिवाय अतिदुर्गम भागही आहे. डेंग्यू, मलेरिया, काविळ, रक्त तपासणी, प्रसूती व इतर उपचाराकरिता खासगी डॉक्टरांकडे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जावे लागते. काही रुग्ण बाहेर गावच्या ठिकाणी असलेल्या खासगी डॉक्टरांकडे जातात. खासगी आरोग्य सेवा घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. गावात आरोग्य पथक असूनही परिपूर्ण व तातडीची आरोग्य सेवा मिळत नसल्याने आसरअल्ली भागातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती रोष आहे.
सर्वसामान्य रुग्ण व नातेवाईकांची ही अडचण लक्षात घेऊन आसरअल्ली येथील प्राथमिक आरोग्य पथकात डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी, औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, गावासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. जि.प.च्या आरोग्य विभागाने समस्या मार्गी लावण्याची मागणी आहे. निवेदनावर राजन्ना किष्टय्या वडलाकोंडा, रामूलू बोमय्या भिमकरी, राजेंद्र बापू उप्पुरपू, कोंडालरेड्डी नागरेड्डी गुडीमेटला आदींच्या स्वाक्षºया आहेत. निवेदन देताना श्रीरामलू नर्सय्या रोड्डा, प्रभाकर नर्सया रोड्डा, मधुकर पोचम रोड्डा, नागूलू बोल्ले, मोहनराजू गुडुरी, रवी गुडीमेटला, सदनपू बापू, बोरे धर्मय्या आदीसह नागरिक उपस्थित होते.
सिरोंचाच्या ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव
सिरोंचा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. संपूर्ण तालुक्यासह शेजारच्या तेलंगणा राज्यातील बरेच रुग्ण या रुग्णालयात औषधोपचारासाठी येतात. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी, औषधसाठा, खाटांची कमतरता आदीसह विविध समस्या कायम असून आरोग्य सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे सदर रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक रुग्णांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात तसेच गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात रेफर केले जाते. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना सुविधा नसल्याचे कारण सांगून गडचिरोलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात रेफर केले जाते. परिणामी गडचिरोलीच्या महिला रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या महिला व बाल रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.