सट्टापट्टीसह दारू विक्रेत्यांवर कारवाई, तिघांना अटक, एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:39 IST2021-08-26T04:39:48+5:302021-08-26T04:39:48+5:30
तालुक्यातील शंकरपूर, विसोरा या ठिकाणी अवैध सट्टा व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी ...

सट्टापट्टीसह दारू विक्रेत्यांवर कारवाई, तिघांना अटक, एक फरार
तालुक्यातील शंकरपूर, विसोरा या ठिकाणी अवैध सट्टा व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी छापा मारला. त्यात सट्टापट्टीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करून आरोपी अनिल चरणदास वालदे याला अटक केली. तसेच कोरेगाव येथे अवैधपणे दारू विक्री करताना आढळून आलेल्या तीन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन आरोपी हस्तगत करण्यात आले तर एक आरोपी फरार आहे.
दोन्ही गुन्ह्यात एकुण १ लाख ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूविक्री प्रकरणी आरोपी लेमराव केशव रामटेके, रा. कोरेगाव, मार्कंड माधवराव गायकवाड, रा. कोरेगाव यांना अटक झाली. तर आरोपी संजय सादिक राय, रा. अरुणनगर हा फरार आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात देसाईगंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात पथकांनी केली.