जलसंधारणचे अभियंते व कंत्रादारावर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:00 AM2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:16+5:30

गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. हुडुकदुमा येथे दोन बंधारे मंजूर करण्यात आले. त्यासाठी शासनाने २१ लाख ४५ हजार ६७४ रूपये मंजूर केले होते. मात्र कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले. याकडे जल व मृद संधारण विभागाच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केले.

Accusations against water conservation engineers and contractors | जलसंधारणचे अभियंते व कंत्रादारावर गुन्हे दाखल

जलसंधारणचे अभियंते व कंत्रादारावर गुन्हे दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतने प्रकरण आणले उघडकीस । कोरची तालुक्यात बंधाऱ्यांचे बांधकाम झाले निकृष्ट दर्जाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हुडुकदुमा येथे चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेले दोन सिमेंट बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे लोकमतने वृत्त प्रकाशीत करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. या बांधकामाच्या चौकशीनंतर जल व मृद संधारण विभागाचे उपविभागीय अभियंता वाय.जी.बरडे, कनिष्ठ अभियंता एम.टी.पेंदाम व कंत्राटदार शताब कुरेशी यांच्यावर भादंवि कलम ४३१, ४०९, ४६८,४७१,४२०,३४ अन्वये बेडगाव पोलीस मदत केंद्रात शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. हुडुकदुमा येथे दोन बंधारे मंजूर करण्यात आले. त्यासाठी शासनाने २१ लाख ४५ हजार ६७४ रूपये मंजूर केले होते. मात्र कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले. याकडे जल व मृद संधारण विभागाच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हे बंधारे पहिल्याच पाण्यात वाहून गेले. याबाबत लोकमतने वाहून गेलेल्या दोन्ही बंधाऱ्यांच्या बातम्या प्रकशीत करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीने प्रत्यक्ष बंधाऱ्यावर जाऊन चौकशी केली असता बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निष्पन्न झाले. जलयुक्त शिवार अभियान समितीचे अध्यक्ष समाधान शेंडगे यांनी कोरचीच्या नायब तहसीलदार रेखा बोके यांना प्राधिकृत करुन बेडगाव पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलीस मदत केंद्रात उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. कोरचीचे प्रभारी पोलीस अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नीतेश पोटे करीत आहेत.

जंगलातील बांधकामांची चौकशी करण्याची मागणी
जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत कोरची तालुक्यातील पड्यालजोग, हेटाळकसा, खसोडा, काडे व हुडुकदुम्मा या गावांमध्ये सुमारे १६ बंधारे बांधले आहेत. जिल्ह्याच्या इतरही तालुक्यांमध्ये शेकडो बंधारे बांधले आहेत. यातील बहुतांश बंधारे जंगल भागात आहेत. यातील बहुतांश बंधारे निकृष्ट असल्याने त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.

Web Title: Accusations against water conservation engineers and contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.