खात्याची माहिती कुणालाही देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:00 AM2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:40+5:30

बँक खात्याशी संबंधित माहिती प्राप्त करून आर्थिक लुबाडणूक होत असल्याचे अनेकदा दिसून येते. कोणतीही बँक ग्राहकांची वैयक्तिक माहिती मागवत नाही. त्यामुळे खाते व एटीएमशी संबंधित माहिती कुणालाही देऊ नये, तसेच माहिती ऑनलाईन वाटणी करू नये, असे आवाहन ठाणेदार सुधाकर देडे यांनी केले.

The account information should not be disclosed to anyone | खात्याची माहिती कुणालाही देऊ नये

खात्याची माहिती कुणालाही देऊ नये

Next
ठळक मुद्देठाणेदारांचे प्रतिपादन : कुरखेडा पोलीस ठाण्यातर्फे घाटी येथे जनजागरण मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगार दूर राहून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करतो. बँक खात्याशी संबंधित माहिती प्राप्त करून आर्थिक लुबाडणूक होत असल्याचे अनेकदा दिसून येते. कोणतीही बँक ग्राहकांची वैयक्तिक माहिती मागवत नाही. त्यामुळे खाते व एटीएमशी संबंधित माहिती कुणालाही देऊ नये, तसेच माहिती ऑनलाईन वाटणी करू नये, असे आवाहन ठाणेदार सुधाकर देडे यांनी केले.
जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस स्टेशन कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने घाटी येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक समीर केदार, नायब तहसीलदार, ए.बी.मडावी, सरपंच सोनी तलांडे, उपसरपंच फाल्गुन फुले, माजी पं.स.सदस्य उद्धव गहाणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवराव ठलाल, शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दादाजी ब्राम्हणकर, मुख्याध्यापक नारायण बांडे, शिक्षक सुधाकर कोडापे, संदीप टेकाम, गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य पीतांबर ठलाल, नारायण कवाडकर, नेपाल जनबंधू, वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन उईके, कमलेश देशमुख, हत्तीरोग निरीक्षक पी.जी.सोरते, वनपाल मनोहर हेपट उपस्थित होते.
जनजागरण मेळाव्यात शासकीय योजनांची माहिती विभागांद्वारे देण्यात आली. महसूल विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सांगण्यात आले. ग्रामीण रोजगार हमी योजना, आम आदमी विमा योजना, निराधार योजना आदींची माहिती दिली. तसेच योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील प्रेमदास पंधरे, संचालन मनोज सोनकुकरा तर आभार त्रिशा गावडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बळीराम पदा, उमेश नेवारे, ललीत जांभुळकर, केवळराम धांडे, रोशन पुराम, लोमेश मेश्राम, देवराव डोंगरे, भगवान तलांडे, गौरीशंकर भैसारे, संगीता चव्हाण, गौरी कुमरे यांनी सहकार्य केले.


आंतरजातीय जोडप्याचा विवाह
तालुक्यातील खरकाडा येथील महेश दुमाने व साक्षी लांजेवार यांचा आंतरजातीय विवाह सोहळा जनजागरण मेळाव्यात पार पाडण्यात आला. त्यानंतर पोलीस प्रशासनातर्फे त्यांना जीवनावश्यक वस्तू आंदण म्हणून देण्यात आल्या. सर्वधर्म समभाव व जातीय सलोखा कायम राखण्यासाठी आंतरजातीय विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. तसेच समाजानेही याबाबत जागरूक व्हावे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.

Web Title: The account information should not be disclosed to anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.