कॅश नेणाऱ्या वाहनाला चामोर्शीजवळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:36+5:30
वाहनामध्ये चालक, सेक्युरिटी यांच्यासह जवळपास चार कर्मचारी उपस्थित होते. चामोर्शी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला रोकड पुरविण्यासाठी सदर वाहन चंद्रपूरवरून चामोर्शीकडे येत होते. भरधाव वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कॅश नेणाऱ्या वाहनाला चामोर्शीजवळ अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चंद्रपूरवरून चामोर्शी येथे रोकड घेऊन येणारे वाहन चामोर्शी-मूल मार्गावरील चाकलपेठ फाट्यावर उलटले. सदर अपघात दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडला.
वाहनामध्ये चालक, सेक्युरिटी यांच्यासह जवळपास चार कर्मचारी उपस्थित होते. चामोर्शी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला रोकड पुरविण्यासाठी सदर वाहन चंद्रपूरवरून चामोर्शीकडे येत होते. भरधाव वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रोकड असल्याने विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक होते. तत्काळ चामोर्शी पोलिसांना पाचारण करण्यात आले. चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या सहकार्याने व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनातील रोकड व इतर साहित्य बाहेर काढून ते दुसऱ्या वाहनाने पाठविण्यात आले.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला हे कळू शकले नाही. वाहन उलटल्याने चालकासह सुरक्षा रक्षकांना थोडीफार जखम झाली. मात्र या अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. वाहन चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने वाहनाचे नियंत्रण सुटून वाहन उलटल्याची शक्यता वर्तविली जात आहे.