भरधाव हायवा ट्रकला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST2020-02-02T06:00:00+5:302020-02-02T06:00:34+5:30

अहेरी येथे सामान पोहचवून ट्रक गडचिरोली मार्गे आरमोरीकडे जात होता. ट्रक चालकाने प्रचंड प्रमाणात दारून ढोसली होती. इंदिरा गांधी चौकातून भरधाव ट्रक जात होता. यात अनेक नागरिक बचावले. वन विभागाच्या नाक्यासमोर ट्रक चालकाला डुलकी आली. जवळपास १०० किमी प्रती किलोमिटरने जात असलेला ट्रक अचानक रस्त्याच्या बाजूला गेला.

Accident on a highway truck | भरधाव हायवा ट्रकला अपघात

भरधाव हायवा ट्रकला अपघात

ठळक मुद्देचालकाने ढोसली होती दारू । अनेक नागरिक बचावले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीवरून आरमोरीकडे जात असलेला भरधाव ट्रक गडचिरोली जवळील वनविभागाच्या नाक्याजवळ उलटला. सदर घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे हायवा ट्रकचा चालक प्रचंड प्रमाणात दारू पिऊन होता.
अहेरी येथे सामान पोहचवून ट्रक गडचिरोली मार्गे आरमोरीकडे जात होता. ट्रक चालकाने प्रचंड प्रमाणात दारून ढोसली होती. इंदिरा गांधी चौकातून भरधाव ट्रक जात होता. यात अनेक नागरिक बचावले. वन विभागाच्या नाक्यासमोर ट्रक चालकाला डुलकी आली. जवळपास १०० किमी प्रती किलोमिटरने जात असलेला ट्रक अचानक रस्त्याच्या बाजूला गेला. सुदैवाने समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने अनुचित घटना घडली नाही. शेतात असलेली सागाची झाडे मोडून ट्रक शेतात शिरला. यात ट्रकचे समोरचे दोन्ही चाक मोडले. त्यामुळे ट्रक थांबला. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी अपघात स्थळी धाव घेतली. त्यावेळी ट्रकचालक दारू पिऊन ट्रकमध्येचे झोपला असल्याचे दिसून आले. युवकांनी त्याला ट्रकमधून बाहेर काढले. सदर ट्रक पोर्ला येथील ठाकरे नामक चालक चालवित होता.

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नाही
एवढी मोठी घटना घडूनही गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार देण्यात आली नाही. हायवा ट्रक चालक हा मोठ्या प्रमाणात दारू पिऊन होता. त्यावेळीच पोलिसांकडे तक्रार केली असती तर पोलीस त्याची वैद्यकीय तपासणी केली असती. त्यात अल्कोहोलचे अधिक प्रमाण आढळून आले असते. त्यामुळे वाहनाचा विमा मिळण्यास अडचण निर्माण झाली असती. त्यामुळे या घटनेची शनिवारी रात्री उशीरापर्यंत तक्रार दिली नव्हती. विशेष म्हणजे, ट्रक चालकाला फार मार लागला नव्हता. कदाचित रविवारी याबाबत तक्रार दिली जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल. त्यावेळी चालकाची दारू उतरल्याने वैद्यकीय तपासणीत आढळून येणार नाही. अशा प्रकारची खेळी वाहन मालकाने खेळली असावी. मात्र अनेकांचे जीव घेण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता असलेल्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.

Web Title: Accident on a highway truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात