गडचिरोली जिल्ह्यात टेम्पोला अपघात; १९ मजूर स्त्रिया जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:32 IST2020-07-02T16:32:29+5:302020-07-02T16:32:50+5:30
वडसा तालुक्यातील डोंगरमेंढा येथून नवरगाव येथे धान रोवणीसाठी मजूर स्त्रियांना घेऊन चाललेल्या टेम्पोला अपघात होऊन त्यात १९ स्त्रिया जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.

गडचिरोली जिल्ह्यात टेम्पोला अपघात; १९ मजूर स्त्रिया जखमी
ठळक मुद्देटायर फुटल्याने झाला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: वडसा तालुक्यातील डोंगरमेंढा येथून नवरगाव येथे धान रोवणीसाठी मजूर स्त्रियांना घेऊन चाललेल्या टेम्पोला अपघात होऊन त्यात १९ स्त्रिया जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. या अपघातात ८ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
नवरगाव येथे धान रोवणीसाठी जात असताना, अचानक टायर फुटल्याने हा टेम्पो गेवर्धा गावाजवळ रस्त्यावर उलटला. यात बसलेल्या सर्व मजूर स्त्रिया गंभीर जखमी झाल्या. गेवर्धा गावातील गावकरी घटनास्थळी धावून आले. गावातील युवकांनी मोटरसायकलींवरून जखमींना रुग्णालयात दाखल केले.