शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

'एक मच्छर...' जगतो फक्त महिनाभर आणि अंडी घालतो हजारावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:45 IST

Gadchiroli : डासाच्या 'अॅनोफिलिस' या प्रजातीने गडचिरोलीकरांचे जगणे मुश्कील केले

संजय तिपालेलोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : अभिनेता नाना पाटेकर यांच्या बहुचर्चित 'यशवंत' सिनेमातील 'एक मच्छर...' हा डायलॉग प्रसिद्ध आहे. याच डासाच्या 'अॅनोफिलिस' या प्रजातीने गडचिरोलीकरांचे जगणे मुश्कील केले आहे. सरत्या वर्षात राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक मलेरिया रुग्ण आढळले, ते शेवटच्या टोकावरील गडचिरोलीत. जिल्ह्याला मलेरियाचे 'हॉटस्पॉट' बनविण्यामागे खरा 'व्हिलन'ही हाच डास. त्याच्या डंखाने पाच वर्षांत तब्बल ५० जणांना आपला जीव गमावावा लागला. 

कुरखेडा, कोरची, धानोरा, एटापल्ली, अहेरी व भामरागड, ही घनदाट जंगल असलेली सहा तालुके मलेरिया प्रभावित आहेत. अवघे २८ दिवसांचे आयुर्मान असलेला 'अॅनोफिलिस' प्रजातीचा हा मादी डास एक हजार अंडी घालतो. गडचिरोली जिल्ह्यात २०२४ मध्ये १,६९१ ग्रामपंचायतींपैकी १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल ७२२ ग्रामपंचायती आरोग्य विभागाने साथरोगाबाबत अतिसंवेदनशील जाहीर केल्या.

या गाांची एकूण २ लाख ७२ हजार ६६ एवढी लोकसंख्या आहे. हिवतापासंदर्भातील चाचण्यांमध्ये ६ हजार ६९८ इतके अहवाल पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ६ हजार ६८५ जण उपचारानंतर बरे झाले. मात्र, दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू झाला.

१ एप्रिलपासून मलेरियामुक्ती आराखड्याची अंमलबजावणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली मलेरियामुक्तीची घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून मलेरियामुक्ती अंमलबजावणी होणार आहे. याकरिता आदिवासी विकास विभागातर्फे २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मलेरियामुक्त गडचिरोलीची घोषणा सत्यात उतरेल काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गडचिरोलीतील पाच वर्षांतील मलेरिया रुग्ण व मृत्यूवर्ष रुग्णसंख्या       मृत्यू२०२० ६४८५             ०६-२०२१ १२३२६           ०८२०२२ ९२०५              १३२०२३ ५८६६              १०२०२४ ६६९८              १३

७ दिवसात होतो प्रौढ 'अॅनोफिलिस' डासाचे उत्पत्ती ठिकाण हे स्वच्छ पाणी, तसेच घनदाट जंगल आहे. जिल्ह्यात ६८ टक्के वनक्षेत्र असल्याने त्यास उत्पत्तीसाठी अधिक पोषक वातावरण आहे. हा मादी डास जेमतेम २८ दिवस जगतो, जन्मानंतर सात दिवसांतच तो प्रौढ होतो. अंडी घालण्यास सुरुवात करतो, मरण्यापूर्वी एका डासाच्या कुटुंबाचा विस्तार एक हजारांहून अधिक सदस्यांचा असतो, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यांनी सांगितले.

"'अॅनोफिलिस' मादी डास हा मलेरिया वाहक आहे. तो रात्री सक्रिय होतो. ताप आल्यास तो अंगावर न काढता किंवा पुजाऱ्याकडे न जाता शासकीय रुग्णालयांत जाऊन तपासणी करावी. १४ वर्षांखालील मुला- मुलींसह वृद्धांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे."-डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली