शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

९९ टक्के खर्चाची नोंद

By admin | Updated: March 2, 2015 01:18 IST

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व पशु वैद्यकीय संस्थेंतर्गत विविध उपक्रम योजना योजना राबवून पशुधनाचा सर्वांगिण विकास करीत असल्याचा दावा जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने केला आहे.

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व पशु वैद्यकीय संस्थेंतर्गत विविध उपक्रम योजना योजना राबवून पशुधनाचा सर्वांगिण विकास करीत असल्याचा दावा जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने केला आहे. याशिवाय या विभागाच्या लेखी पशुधन विकासाच्या सर्व योजनांवर ९९ टक्के निधी जानेवारी २०१५ अखेरपर्यंत खर्च झाल्याची नोंद आहे. मात्र दुर्गम भागातील अनेक शेतकरी व पशुपालक अद्यापही जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचे दिसून येते. राज्य शासनाचे व केंद्र शासनाचे अनेक विभाग शासकीय योजना प्रभाविपणे राबविल्याचा कांगावा करून १०० टक्के निधी खर्च केल्याचे कागदोपत्री बऱ्याचदा दाखवितात. मात्र प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळत नसल्याने तळागाळातील गरजू नागरिक विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत बिगर आदिवासी, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत अनेक उपक्रम राबविले जातात. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरूस्ती व बांधकाम करण्यात येते. आदिवासी उपययोजनेंतर्गत जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला पशुवैद्यकीय इमारत बांधकामासाठी डीपीडीसीमधून १०० लक्ष रूपयाचा नियतव्यय प्रस्तावित होता. तेवढीच अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून १०० लक्ष रूपयाचा निधी प्रत्यक्षात बीडीएस प्रणालीवर उपलब्ध झाला. पशुसंवर्धन विभागाने मागील महिन्यापर्यंत ६० लक्ष व चालू महिन्यात ४० लक्ष असे एकूण १०० लक्ष रूपये खर्च झाले असून या खर्चाची टक्केवारी १०० असल्याची नोंद घेतली आहे. या निधीतून गोविंदगाव, भाडभिडी, दोलंदा, येंगलखेडा, रांगी व सुरसुंडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे दाखविले आहे. याच योजनेंतर्गत शेळी गटाच्या वाटपासाठी २४ लक्ष रूपयांचा निधी बीडीएस प्रणाली उपलब्ध झाला. यातून ७० गटांना शेळींचे वाटप करण्यात आले असून १०० टक्के निधी खर्च झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे. सदर निधी पंचायत समितीस्तरावर वितरित करण्यात आल्याची नोंद आहे.दुधाळू जनावर गट वाटप व खाद्य वाटपासाठी ३६ लक्षविशेष घटक योजनेंतर्गत दुधाळू जनावरांचे गट वाटप व दुभत्या जनावरांना खाद्य वाटप करण्यासाठी जि.प. पशुसंवर्धन विभागाला ३६ लक्ष रूपयाची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली. या विभागाला या कामासाठी बीडीएस प्रणालीवर दुधाळू जनावरांच्या गट वाटपासाठी ३० लक्ष व दुभत्या जनावरांना खाद्य वाटप करण्यासाठी ६ लक्ष रूपयाचा निधी उपलब्ध झाला. संपूर्ण ३६ लक्ष रूपये फेब्रुवारी अखेरपर्यंत पंचायत समितीस्तरावर वितरित केला असल्याची नोंद जि.प. पशुसंवर्धन विभागाने घेतली असून खर्चाची टक्केवारी १०० दाखविली आहे. निधी मिळूनही पं.स. प्रशासन योजनेच्या अंमलबजावणीत मागे असल्याचे दिसून येते.