९८८ 'मोदी आवास'चे अनुदान प्रलंबित; घरकुलांचे बांधकाम अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 16:30 IST2025-04-14T16:29:39+5:302025-04-14T16:30:57+5:30

Gadchiroli : ७५.७९ % मोदी आवास योजनेच्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.

988 'Modi Awas' grants pending; Construction of houses incomplete | ९८८ 'मोदी आवास'चे अनुदान प्रलंबित; घरकुलांचे बांधकाम अपूर्ण

988 'Modi Awas' grants pending; Construction of houses incomplete

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
मागील वर्षी राज्य शासनाच्या वतीने 'मोदी आवास' योजनेची अंमलबजावणी केली. सदर योजनेंतर्गत अनेक घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले; तर सध्या बांधकाम पूर्णत्वास येत आहेत. अशा ९८८ घरकुल लाभार्थ्यांना अजूनपर्यंत अनुदान मिळालेले नाही. या लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


ओबीसी प्रवर्गातील गरजू कुटुंबांना निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'मोदी आवास' योजना अंमलात आणण्यात आली. सदर योजनेंतर्गत जिल्ह्याला ६ हजार ५४८ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. लाभार्थ्यांकडून अर्ज मागविल्यानंतर ही सर्वच घरे मंजूर करण्यात आली होती. यापैकी ४ हजार ९६३ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.


बांधकामे झाली ठप्प
विशेष म्हणजे, ५ हजार ५६० लाभार्थ्यांना अनुदानाचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आला. मात्र, एकूण मंजूर घरकुलांपैकी अजूनही ९८८ घरकुलांना अनुदानाचे वितरण करण्यात आलेले नाही. यापैकी अनेक लाभार्थ्यांना दुसरा हप्तासुद्धा मिळालेला नाही. परिणामी बांधकामे ठप्प पडली आहेत. शासनाने लवकर अनुदान द्यावे. 


प्रलंबित हप्ते            लाभार्थी संख्या
पहिला हप्ता                   १०
दुसरा हप्ता                   ३९७
तिसरा हप्ता                  ५८१


दीड हजार घरे अपूर्ण
जिल्ह्यातील मोदी आवास योजनेच्या एकूण मंजूर घरांपैकी १ हजार ५८५ घरकुलांचे काम अपूर्ण आहे. बहुतांश लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने त्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले नाही, असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. मोदी आवास योजनेच्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी लवकर अनुदान जमा करावे, अशी मागणी लाभार्थी करीत आहेत.

Web Title: 988 'Modi Awas' grants pending; Construction of houses incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.