८५६ अंगणवाड्यात पोहोचला गॅस

By Admin | Updated: January 30, 2017 03:28 IST2017-01-30T03:28:14+5:302017-01-30T03:28:14+5:30

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून गडचिरोली

856 gases in the anganwadi | ८५६ अंगणवाड्यात पोहोचला गॅस

८५६ अंगणवाड्यात पोहोचला गॅस

इंधनाचा प्रश्न मार्गी : अमृत आहार योजनेचा स्वयंपाक झाला सुकर; १० हजारांवर लाभार्थ्यांना लाभ
दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १ हजार ८२९ अंगणवाडी केंद्रांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर मंजूर करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत ८५६ अंगणवाडी केंद्रांमध्ये गॅस सिलिंडर पोहोचले आहे. त्यामुळे इंधनाचा प्रश्न मार्गी लागला असून स्वयंपाक सुकर झाला आहे.
अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीमध्ये व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर तिमाहीमध्ये एकवेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम आहार योजना १८ नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू आहे. त्या अनुषंगाने अंगणवाड्यांना गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, शेगडी व सुरक्षा पाईप पोहोचविण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार गॅस सिलिंडर वितरकांकडून गॅस सिलिंडर व इतर साहित्य गडचिरोली जिल्ह्याच्या अंगणवाड्यांमध्ये पोहोचविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले आहे.
अमृत आहार योजनेंतर्गत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील एकूण १ हजार ३५४ व ४७५ मिनी अंगणवाड्या अशा एकूण १ हजार ८२९ अंगणवाडी केंद्र समाविष्ट करण्यात आले आहेत. या अंगणवाड्यांमधून १० हजारवर गरोदर व स्तनदा माता एकवेळ चौरस आहाराचा लाभ घेत आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील २५३, आरमोरी तालुक्यातील ९९, भामरागड १३५, चामोर्शी १७३, देसाईगंज २८, धानोरा २९५, एटापल्ली २२०, गडचिरोली ५९, कोरची १५०, कुरखेडा १९१, मुलचेरा ५८ व सिरोंचा तालुक्यातील १६८ अंगणवाड्यांचा समावेश आहे.
राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून १ हजार ३५२ अंगणवाड्या व ४५९ मिनी अंगणवाड्या अशा एकूण १ हजार ८११ अंगणवाडी केंद्रात गॅस शेगडी पोहोचली आहे. अद्यापही १८ अंगणवाडी केंद्रात शेगड्या पोहोचल्या नाहीत. यामध्ये अहेरी तालुक्यातील सात, भामरागड दोन, धानोरा सहा व एटापल्ली तालुक्यातील तीन अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बाल कल्याण अधिकारी या योजनेच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेत आहेत.

सर्वाधिक लाभार्थी अहेरी तालुक्यात
४अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अहेरी तालुक्यात मिनी व मोठ्या अंगणवाड्या मिळून एकूण २५३ अंगणवाड्यांमध्ये आहार शिजविला जात आहे. ८१७ गरोदर व १ हजार ६७ स्तनदा माता अशा एकूण १ हजार ८३८ लाभार्थ्यांना आहाराचा लाभ दिला जात आहे.

कुपोषणाची समस्या कमी होणार
४डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर, स्तनदा माता व सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रातून आहार पुरविला जात असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. गरीबी व अज्ञानामुळे आरोग्य शास्त्रानुसार पुरेसा आहार मिळत नसल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुपोषीत बालकांची संख्या अधिक आढळून येत होती. सदर आहार योजनेमुळे कुपोषणाची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.

टप्पा दोन अंतर्गत ६३ हजार बालकांना लाभ
४५ आॅगस्ट २०१६ च्या शासन निर्णयान्वये सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना अंडी, केळी व ऋतूमानानुसार फळे आदींचा अतिरिक्त आहार पुरविण्याची योजना दुसऱ्या टप्प्यांतर्गत कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील एकूण १३ हजार ९६७ बालकांना अंडी, केळी आदींच्या आहाराचा लाभ दिला जात आहे. यामुळे बालकांची संख्या अंगणवाडीत वाढली आहे.

Web Title: 856 gases in the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.