पाच मृत्यूंसह ८३ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:39 IST2021-05-27T04:39:00+5:302021-05-27T04:39:00+5:30

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित २८९८९ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २६८१९ वर पोहोचली, तसेच सध्या १४६६ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ...

83 new coronaviruses with five deaths | पाच मृत्यूंसह ८३ नवीन कोरोनाबाधित

पाच मृत्यूंसह ८३ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित २८९८९ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २६८१९ वर पोहोचली, तसेच सध्या १४६६ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७०४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. बुधवारी ५ नवीन मृत्यूंमध्ये हेटी, ता. धानोरा, जि. गडचिरोली येथील ५० वर्षीय पुरुष, चामोर्शी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथील ५१ वर्षीय पुरुष, येरांडी, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली येथील ७० वर्षीय पुरुष, मोहझरी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली येथील ४८ वर्षीय पुरुष, चंद्रपूर, जि. चंद्रपूर येथील ५५ वर्षीय महिला यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२. ५१ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ५.६ टक्के, तर मृत्यूदर २.४३ टक्के झाला.

नवीन ८३ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २१, अहेरी तालुक्यातील ४, आरमोरी ६, भामरागड तालुक्यातील १, चामोर्शी तालुक्यातील १५, धानोरा तालुक्यातील ४, एटापल्ली तालुक्यातील ५, कोरची तालुक्यातील २, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये २, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये १०, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये ३, तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये १० जणांचा समावेश आहे, तर आज कोरोनामुक्त झालेल्या १३४ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ५०, अहेरी ३, आरमोरी १३, चामोर्शी २६, धानोरा १, एटापल्ली ४, मुलचेरा १८, सिरोंचा ३, कोरची ५, कुरखेडा ७, तसेच वडसा येथील ४ जणांचा समावेश आहे.

Web Title: 83 new coronaviruses with five deaths