धानोरा टोला नदी शिवारातील ८० हजारांचा मोहसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:38+5:302021-03-29T04:22:38+5:30
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील धानोरा टोला नदी परिसरात पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत ८० हजारांचा ...

धानोरा टोला नदी शिवारातील ८० हजारांचा मोहसडवा नष्ट
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील धानोरा टोला नदी परिसरात पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत ८० हजारांचा मोहसडवा नष्ट केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेते धास्तावले आहेत.
धानोरा टोला परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होते. होळी सणादरम्यान दारू पिणाऱ्यांची रांग असते. दारूविक्रेत्यांसाठी अधिक पैसे कमविण्याची ही चांगली संधी असते. या उद्देशाने येथील दारूविक्रेत्यांनी कठाणी नदी परिसरात अवैध दारूचे अड्डे निर्माण केले होते. याबाबतची माहिती धानोरा पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूला प्राप्त होताच नदी परिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान दारूविक्रेत्यांनी टाकलेला ८० हजारांचा मोहसडवा व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. यामुळे दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही कारवाई धानोराचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजपूत, बीट जमादार कोडाप, पोलीस कर्मचारी व मुक्तिपथ तालुका चमूने केली.