लोकअदालतीत ८० प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:06 IST2018-09-10T23:06:24+5:302018-09-10T23:06:41+5:30
देशातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व विविध संस्था तसेच बँकेतील दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीच्या आदेशानुसार ८ सप्टेंबर रोजी शनिवारला जिल्ह्याच्या सर्व न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयात जिल्हाभरात एकूण ८० प्रकरणे निकाली काढण्यात आली व या प्रकरणातून एकूण ९३ लाख ३८ हजार रूपयांची वसुली करण्यात आली.

लोकअदालतीत ८० प्रकरणे निकाली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व विविध संस्था तसेच बँकेतील दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीच्या आदेशानुसार ८ सप्टेंबर रोजी शनिवारला जिल्ह्याच्या सर्व न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयात जिल्हाभरात एकूण ८० प्रकरणे निकाली काढण्यात आली व या प्रकरणातून एकूण ९३ लाख ३८ हजार रूपयांची वसुली करण्यात आली.
राष्टÑीय लोक न्यायालयामध्ये ५१ लाख ६८ हजार ४४१ रूपयांची एकूण २३ प्रकरणे प्रलंबित होती. तसेच ४१ लाख ३१ हजार ५९७ रूपयांची दाखलपूर्व प्रकरणाची संख्या ५७ होती. प्रलंबित व दाखलपूर्व अशी सर्व मिळून एकूण ८० प्रकरणे लोक न्यायालयात निकाली काढण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राधिकरणाचे सचिव डी. जी. कांबळे यांच्या देखरेखीखाली लोकअदालत घेण्यात आली. जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी पॅनल क्रमांक १ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. तर दिवानी न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी पॅनल क्रमांक २ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पी. बी. बोरावार व इतर अधिवक्ता मंडळी, विधी स्वयंसेवक तसेच बँकांच्या पदाधिकारी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.