१८ वर्षांपुढील ८ लाख नागरिकांना मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:30+5:302021-04-21T04:36:30+5:30
बाॅक्स आठवडाभर पुरेल एवढाच साठा राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच गडचिराेली जिल्ह्यातही लसचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही केंद्रांवर लस नसल्याने ...

१८ वर्षांपुढील ८ लाख नागरिकांना मिळणार लस
बाॅक्स
आठवडाभर पुरेल एवढाच साठा
राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच गडचिराेली जिल्ह्यातही लसचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही केंद्रांवर लस नसल्याने नागरिकांना परत जावे लागत आहे.
जिल्ह्याला साेमवारी ४ हजार ५०० लस उपलब्ध झाल्या आहेत. मात्र लसीकरण केंद्रांची संख्या अधिक असल्याने या लस आठच दिवस पुरतील.
लसीकरणात ज्येष्ठही मागेच
जिल्ह्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे जवळपास ८० हजार नागरिक आहेत. त्यापैकी १९ एप्रिलपर्यंत केवळ १८ हजार ४०३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. उद्दिष्ट असलेल्या लाेकसंख्येपैकी केवळ २३ टक्के लाेकसंख्येला लस उपलब्ध झाली आहे. त्यातही लस घेणाऱ्यांमध्ये शहरी भागातील नागरिकांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागातील नागरिक वंचित आहेत.
४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ५ टक्केच नागरिकांना लस
गडचिराेली जिल्ह्यात ४५ वर्षं वयापेक्षा जास्त जवळपास ३ लाख नागरिक आहेत. त्यापैकी केवळ १७ हजार ६५४ जणांनी पहिली लस घेतली आहे. उद्दिष्टित लाेकसंख्येच्या तुलनेत टक्केवारीमध्ये हे प्रमाण केवळ ५ टक्के आहे.
दुसऱ्या डाेजचे काय?
जिल्हाभरात लसचा तुटवडा आहे. अनेक जणांना पहिला डाेज मिळण्यास अडचण जात आहे. नागरिक केंद्रावर जाऊन परत येत आहेत.
२८ दिवसांनंतर दुसरा डाेज घ्यायचा हाेता. यासाठी संबंधित व्यक्तीला संदेश येणार हाेता. मात्र काही नागरिकांना संदेश प्राप्त हाेत नसल्याची तक्रार आहे. तर ज्या नागरिकांना संदेश येत आहे, त्यांना लस मिळत नसल्याचे चित्र आहे.
साेमवारी ४ हजार ५०० लसचा पुरवठा करण्यात आला. मागणीच्या तुलनेत हा पुरवठा अतिशय कमी आहे. त्यामुळे अधिकचा पुरवठा हाेण्याची गरज आहे.
लसीकरण केंद्रही वाढवावे लागणार
सध्या जिल्ह्यात ६८ शासकीय व २ खासगी काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र आहेत. १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस द्यायची झाल्यास लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. प्रत्येक उपकेंद्रस्तरावर लसीकरण केंद्र स्थापन करावे लागणार आहे. यासाठी माेठ्या प्रमाणात लसचा पुरवठा करावा लागणार आहे. तसेच आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी लागणार आहे.
जिल्ह्याची एकूण लाेकसंख्या ११,००,०००
१८ वर्षांपेक्षा अधिक लाेकसंख्या ७,७०,०००
महिला ५,४०,०००
पुरुष ५,६०,०००