शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

आठ कोटीतून गडचिरोलीत इनडोअर स्टेडियम होणार

By admin | Updated: January 10, 2016 01:35 IST

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये संधी मिळावी म्हणून गडचिरोली येथे आठ कोटी ...

पालकमंत्र्यांची घोषणा : एटापल्ली येथे तालुका क्रीडा व बाल सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटनएटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये संधी मिळावी म्हणून गडचिरोली येथे आठ कोटी रूपये खर्च करून इनडोअर स्टेडियम बांधण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकलव्य स्पोर्टस् अकॅडमी स्थापन करून नामांकित खेळाडूद्वारे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. शनिवारी एटापल्ली तालुका क्रीडा व बाल सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते मशालीच्या साहाय्याने क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.चे सभापती दीपक फुलसंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.चे उपसभापती संजय चरडुके, पं.स. सदस्य केशव पुडो, तहसीलदार संपत खलाटे, नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार, नगरसेवक विजय नल्लावार, तात्या दुर्वा, दीपक सोनटक्के, सल्लागार समितीचे सदस्य मनोहर हिचामी, गट विकास अधिकारी पी. व्ही. लुटे, गट शिक्षणाधिकारी एन. डी. माटुरकर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री आत्राम यांनी एटापल्लीसह जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यात क्रीडा संकुल नाही, तेथे क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.यावेळी सांगितले. कस्तुरबा गांधी कन्या शाळा, समूह निवासी शाळा व तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांसमोर नृत्य सादर केले. विविध संघटनांच्या वतीने पालकमंत्र्यांचे स्वागत याप्रसंगी करण्यात आले. संचालन केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार यांनी तर प्रास्ताविक संवर्ग विकास अधिकारी लुटे यांनी केले. २ वाजता होणारा नियोजित उद्घाटन सोहळा पालकमंत्री तीन तास उशीरा पोहोचल्याने ५ वाजता सुरू करण्यात आला. तोपर्यंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांनाही पालकमंत्र्यांची प्रतीक्षा करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)