७५ मतिमंदांना साहित्य वितरण तर १०८ रुग्णवाहिकेच्या चमूचा सत्कार

By Admin | Published: January 7, 2016 02:06 AM2016-01-07T02:06:23+5:302016-01-07T02:06:23+5:30

चामोर्शी पत्रकार संघातर्फे स्थानिक स्वामी विवेकानंद मतिमंद निवासी विद्यालयात बुधवारी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर

75 distribution of literature to mentally retarded and 108 ambulance staff felicitated | ७५ मतिमंदांना साहित्य वितरण तर १०८ रुग्णवाहिकेच्या चमूचा सत्कार

७५ मतिमंदांना साहित्य वितरण तर १०८ रुग्णवाहिकेच्या चमूचा सत्कार

googlenewsNext

चामोर्शी व अहेरीत कार्यक्रम : पत्रकार संघाचा पुढाकार
चामोर्शी : चामोर्शी पत्रकार संघातर्फे स्थानिक स्वामी विवेकानंद मतिमंद निवासी विद्यालयात बुधवारी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिवसानिमित्त ७५ मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक प्रमोद वायलालवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष लोमेश बुरांडे, सहसचिव चंद्रकांत कुनघाडकर, कोषाध्यक्ष अयाज शेख, सदस्य नरेंद्र सोमनकर, अमित साखरे, रमेश झरकर, सुरभी गुडेपवार, भारत बक्षी, राजेंद्र गाजर्लावार व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत कुनघाडकर तर आभार अयाज शेख यांनी मानले.
विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अहेरी - येथे बाळशास्त्री जांभेकर जयंतीचे औचित्य साधून १०८ रुग्ण वाहिकेच्या चमूचा सत्कार, कर्करोग ग्रस्तांना साहित्य वितरण तसेच रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरीतील ज्येष्ठ पत्रकार ए. आर. खान होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी १०८ रुग्ण वाहिकेचे तज्ज्ञ डॉ. कटरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ए. आर. खान, पत्रकार संघाचे अध्यक्ष गिरीश मद्देर्लावार, प्रकाश दुर्गे, विवेक बेझलवार, प्रा. किशोर बुरबुरे, सुधाकर उमरगुंडावार, अहेरीचे माजी उपसरपंच सचिन पेदापल्लीवार उपस्थित होते. तत्पूर्वी विश्रामगृहात बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले तर साईकिरण पालकुर्तीवार या कर्करोगग्रस्त युवकाच्या मदतीसाठीही निधी गोळा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर दुर्गे तर संचालन सुरेंद्र अलोणे, आभार विवेक बेझलवार यांनी मानले.
यावेळी प्रशांत पत्तीवार, रंगया रेपकवार, जावेद अली, निसार सय्यद, दशरथ सुनतकर, मेहबुब अली, दीपक सुनतकर, प्रशांत नामनेवार आदी उपस्थित होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकरांना आदरांजली वाहून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Web Title: 75 distribution of literature to mentally retarded and 108 ambulance staff felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.