७० टक्के रुग्ण गडचिराेली तालुक्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:33 IST2021-03-15T04:33:07+5:302021-03-15T04:33:07+5:30

बाॅक्स भामरागड तालुका काेराेनामुक्त सध्या २४१ काेराेना सक्रिय रुग्ण आहेत. प्रत्येक तालुक्यात रुग्ण आहेत. मात्र, भामरागड तालुका अपवाद राहिला ...

70% patients in Gadchiraeli taluka only | ७० टक्के रुग्ण गडचिराेली तालुक्यातच

७० टक्के रुग्ण गडचिराेली तालुक्यातच

बाॅक्स

भामरागड तालुका काेराेनामुक्त

सध्या २४१ काेराेना सक्रिय रुग्ण आहेत. प्रत्येक तालुक्यात रुग्ण आहेत. मात्र, भामरागड तालुका अपवाद राहिला आहे. गडचिराेली तालुक्यानंतर सर्वाधिक रुग्ण देसाईगंज व आरमाेरी तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये पाचपेक्षा कमी रुग्ण आहेत.

बाॅक्स

रुग्णालयातच उपचार घेण्यास पसंती

काेराेनाचा फारसा त्रास नसणाऱ्या रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, रुग्ण दवाखान्यातच राहून उपचार घेण्यास पसंती दर्शवीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या एकूण २४१ रुग्णांपैकी केवळ २१ रुग्णच घरी राहून उपचार घेत आहेत.

बाॅक्स

भामरागड व मुलचेरा तालुक्यात एकाचाही मृत्यू नाही

काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०८ आहे. मृत्यू झालेल्यांमध्येही गडचिराेली तालुक्यातील सर्वाधिक ४२ रुग्णांचा समावेश आहे. मुलचेरा व भामरागड या दाेन तालुक्यांमधील एकाचाही मृत्यू झाला नाही.

Web Title: 70% patients in Gadchiraeli taluka only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.