१० रेतीघाटांमधून सात कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:42 IST2021-02-20T05:42:25+5:302021-02-20T05:42:25+5:30
२०२२-२३ पर्यंत संबंधितांचा त्यावर अधिकार राहणार आहे. मात्र त्यांना दरवर्षी त्याचा मोबदला शासनाकडे भरावा लागेल. निविदा न आलेल्या १५ ...

१० रेतीघाटांमधून सात कोटींचा महसूल
२०२२-२३ पर्यंत संबंधितांचा त्यावर अधिकार राहणार आहे. मात्र त्यांना दरवर्षी त्याचा मोबदला शासनाकडे भरावा लागेल.
निविदा न आलेल्या १५ रेतीघाटांमध्ये अनेक मोठ्या घाटांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर असलेल्या मुकडीगटा रै., मद्दीकुंटा, रेगुंठामाल, अंकिसामाल, चिंतरवेला आणि आरडा आदी घाटांचा समावेश आहे. या घाटांची किंमत प्रत्येकी २.४७ कोटी ते ३.७१ कोटी आहे. यावर्षी तेलंगणा राज्यातील अनेक रेतीघाट आधीच सुरू करण्यात आल्यामुळे आणि या घाटांना अपेक्षित प्रतिसाद मिळणार की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. यासोबतच कुरखेडा तालुक्यातील सती नदी, चामोर्शी तालुक्यातील पोहार आणि कठाणी नदीवरील काही घाटांचा लिलाव होऊ शकला नाही. त्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया केली जात आहे.
(बॉक्स)
लिलाव झालेले घाट आणि त्यांची किंमत
बोदलीमाल (८४ लाख), लांझेडा (७६ लाख), अडपल्ली-१ (४५.७५ लाख), अडपल्ली-२ (५९.५१ लाख), आंबेशिवणी-राममंदिरघाट (४६ लाख), दिभनाचक (६० लाख), रामपूरचक (७७ लाख), वनखी (१.६० कोटी), नान्हीघाट (५६ लाख), मेडाराममाल (३५ लाख)