दिवसभरात ५७७ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:35 AM2021-05-01T04:35:09+5:302021-05-01T04:35:09+5:30

आतापर्यंत बाधित २१,१७७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १६,२२५ वर पोहचली. तसेच सध्या ४,५५२ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू ...

577 corona free throughout the day | दिवसभरात ५७७ कोरोनामुक्त

दिवसभरात ५७७ कोरोनामुक्त

Next

आतापर्यंत बाधित २१,१७७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १६,२२५ वर पोहचली. तसेच सध्या ४,५५२ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४०० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज १६ नवीन मृत्यूंमध्ये ६५ वर्षीय पुरुष आष्टी ता. चामोर्शी, ६३ वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा, ४३ वर्षीय पुरुष आलापल्ली ता. अहेरी, ६५ वर्षीय पुरुष देशपूर ता. आरमोरी, २० वर्षीय महिला पेट ता. चामोर्शी, ६७ वर्षीय पुरुष गोगाव ता. गडचिरोली, ५१ वर्षीय पुरुष वडधा ता. आरमोरी, ७० वर्षीय पुरुष देसाईंगंज, ५८ वर्षीय पुरुष गडचिरोली, ३३ वर्षीय पुरुष कुरखेडा , ६८ वर्षीय पुरुष विसोरा ता. देसाईगंज, ४० वर्षीय पुरुष मोहझरी ता. आरमोरी, ५० वर्षीय पुरुष नागभीड जि. चंद्रपूर, ८० वर्षीय पुरुष एटापल्ली, ६९ वर्षीय पुरुष हलबी डोंगरगाव ता. वडसा, ६५ वर्षीय पुरुष बेलगाव ता. कुरखेडा, यांचा नवीन मृत्यूंमध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.६२ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण २१.५० टक्के तर मृत्यूदर १.८९ टक्के झाला.

नवीन ५१९ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८२, अहेरी तालुक्यातील ३८, आरमोरी ४६, भामरागड तालुक्यातील ७, चामोर्शी तालुक्यातील ५३, धानोरा तालुक्यातील २२, एटापल्ली तालुक्यातील ४६, कोरची तालुक्यातील ६, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये २९, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये १५, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये ३६ तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये ३९ जणांचा समावेश आहे. तर शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या ५७७ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १७४, अहेरी ५१, आरमोरी ६९, भामरागड १३, चामोर्शी ३५, धानोरा ३३ , एटापल्ली ३९, मुलचेरा १०, सिरोंचा १८, कोरची १८, कुरखेडा ४६, तसेच वडसा येथील ७१ जणांचा समावेश आहे.

Web Title: 577 corona free throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.