२० जणांच्या मृत्यूसह ५०६ नवीन काेराेनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:39+5:302021-05-03T04:31:39+5:30
जिल्ह्यातील एकूण काेरेानाबाधितांची संख्या २२ हजार २५७ एवढी झाली आहे. एकूण १७ हजार १०५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. ...

२० जणांच्या मृत्यूसह ५०६ नवीन काेराेनाबाधित
जिल्ह्यातील एकूण काेरेानाबाधितांची संख्या २२ हजार २५७ एवढी झाली आहे. एकूण १७ हजार १०५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ४ हजार ७१५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण ४३७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
आज २० नवीन मृत्यूमध्ये ७० वर्षीय पुरुष कुरखेडा, ३८ वर्षीय पुरुष जारावंडी ता. एटापल्ली, ६० वर्षीय पुरुष लगाम ता. मुलचेरा, ७७ वर्षीय महिला आरमोरी, ५० वर्षीय पुरुष ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर, ४९ वर्षीय महिला कुरखेडा, ६४ वर्षीय पुरुष गोविंदपूर, ५५ वर्षीय पुरुष डोंगरगाव ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर, ४३ वर्षीय पुरुष कोंढाळा ता. देसाईगंज, ५५ वर्षीय पुरुष देसाईगंज, ६० वर्षीय गडचिरोली, ४८ वर्षीय पुरुष सीआरपीएफ धानोरा, ५२ वर्षीय पुरुष चिरचाळी ता.कुरखेडा, ७३ वर्षीय नागपूर, ६० वर्षीय पुरुष रामकुष्णपूर ता.चामोर्शी, ४५ वर्षीय पुरुष शंकरपुरी ता. देसाईगंज, ६५ वर्षीय महिला नागपूर, ५५ वर्षीय पुरुष ता. ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर, ६० वर्षीय पुरुष ता.नागभीड जि.चंद्रपूर, ६९ वर्षीय पुरुष ता.सावली जि.चंद्रपूर यांचा समावेश आहे.
नवीन ५०६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १९७, अहेरी तालुक्यातील ३२, आरमोरी ३५, भामरागड २१, चामोर्शी ४६, धानोरा १९, एटापल्ली १२, कोरची १२, कुरखेडा ३०, मुलचेरा १४, सिरोंचा ४५ तर देसाईगंज ४३ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ४८३ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १५३, अहेरी २५, आरमोरी ५२, चामोर्शी ५७, धानोरा ३४, एटापल्ली २१, मुलचेरा २५, सिरोंचा ९, कोरची २९, कुरखेडा ३९, तसेच देसाईगंज येथील ३९ जणांचा समावेश आहे.