५० हजारांचे सुगंधित तंबाखूयुक्त पदार्थ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:01 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:01:13+5:30

प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व तत्सम पदार्थांची साठवणूक करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने धाड टाकली असता, त्याच्या घरून १६० किलो सुपारी, ५० किलो खर्रापन्नी, २० किलो सुगंधीत सुपारी, १७ सुगंधीत तंबाखूचे डबे, १४ गुटखा पुडे, ३८ तंबाखूचे पुडे, असा एकूण ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

50 thousand fragrant tobacco items seized | ५० हजारांचे सुगंधित तंबाखूयुक्त पदार्थ जप्त

५० हजारांचे सुगंधित तंबाखूयुक्त पदार्थ जप्त

ठळक मुद्देदेसाईगंजात कारवाई : दामदुपटीने विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या पथकाने देसाईगंज येथील हनुमान वॉर्डातील नीतेश नरहरी हाडगे यांच्या घरून ५० हजार रूपये किमतीचे तंबाखूयुक्त पदार्थ जप्त केले आहेत.
नीतेश हाडगे यांनी प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व तत्सम पदार्थांची साठवणूक करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने धाड टाकली असता, त्याच्या घरून १६० किलो सुपारी, ५० किलो खर्रापन्नी, २० किलो सुगंधीत सुपारी, १७ सुगंधीत तंबाखूचे डबे, १४ गुटखा पुडे, ३८ तंबाखूचे पुडे, असा एकूण ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, नायब तहसीलदार नैैताम, पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, मुक्तिपथच्या तालुका संघटिका भारती उपाध्ये यांच्या पथकाने केली. लॉकडाऊनच्या कालावधीत तंबाखूयुक्त पदार्थ विक्रीस बंदी असतानाही हाडगे हा स्वत:च्या घरी सुगंधीत तंबाखू साठवून त्याची दाम दुप्पट विक्री करीत होता.

Web Title: 50 thousand fragrant tobacco items seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.