५० किलो गोमांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:50 AM2017-11-30T00:50:07+5:302017-11-30T00:50:31+5:30

बजरंगदल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू गावाजवळ वाहन अडवून सुमारे ५० किलो गोमांस जप्त केले आहे.

50 kg beef seized | ५० किलो गोमांस जप्त

५० किलो गोमांस जप्त

Next
ठळक मुद्देदोघे ताब्यात : बोटलाचेरू गावाजवळ कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : बजरंगदल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू गावाजवळ वाहन अडवून सुमारे ५० किलो गोमांस जप्त केले आहे.
वेलगूर येथून आलापल्लीकडे गोमांस आणला जात असल्याची माहिती बजरंगदल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना प्राप्त झाले. त्यानुसार बोटलाचेरूजवळ सापडा रचला. वेलगूर कडून आलापल्लीकडे जात असलेल्या एमएच ३३ जी १९९५ क्रमांकाच्या वाहनाला थांबवून तपासणी केली असता, सदर वाहनांमध्ये अंदाजे ५० किलो गोमांस आढळून आले. या प्रकरणी वाहनचालकासह दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. एक आरोपी फरार आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीस कारवाई करीत होते. बजरंग दलाचे संतोष अग्रवाल, शुभम चिट्टीवार, भाष्कर गुडपवार, दौलत रामटेके, शंकर मेश्राम, रवी नेलकुद्री, दीपक तोगरवार, वशील मोकाशी, रोहित नर्रेवार, प्रशांत मंडल, राकेश ठोसरे, देवेंद्र खतवार, पवन दोंतुलवार व अमित बेझलवार यांनी कारवाई करीत वाहन पकडले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

Web Title: 50 kg beef seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.