४३ हजारांची दारू जप्त

By Admin | Updated: June 21, 2017 01:32 IST2017-06-21T01:32:50+5:302017-06-21T01:32:50+5:30

तालुक्यातील सगणापूर येथील विनोद लिंगय्या येगलोपवार याच्या घरी गडचिरोली एसडीपीओ पथकाने

43 thousand liquor seized | ४३ हजारांची दारू जप्त

४३ हजारांची दारू जप्त

चामोर्शीतील घटना : गडचिरोली एसडीपीओ पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील सगणापूर येथील विनोद लिंगय्या येगलोपवार याच्या घरी गडचिरोली एसडीपीओ पथकाने मंगळवारी धाड टाकून सुमारे ४३ हजार रूपयांची दारू जप्त केली आहे.
विनोद येगलोपवार हा देशी व विदेशी दारू विकत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला देण्यात आली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात सापळा रचून धाड टाकली. सदर कारवाई पोलीस हवालदार राजेंद्र तितीरमारे, विजय राऊत, दीपक डोंगरे, साईनाथ उडाण यांनी केली.

Web Title: 43 thousand liquor seized