शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज येथे ४११ जणांनी केले रक्तदान

By admin | Updated: April 30, 2016 01:21 IST

संत निरंकारी मंडळाच्या वतीने आरमोरी मार्गावर असलेल्या संत निरंकारी सत्संग भवनात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

देसाईगंज : संत निरंकारी मंडळाच्या वतीने आरमोरी मार्गावर असलेल्या संत निरंकारी सत्संग भवनात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण ४११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संत निरंकारी मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमादरम्यान जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी स्वत: रक्तदान करून उपक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार क्रिष्णा गजबे, नगराध्यक्ष शाम उईके, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, गटनेता किसन नागदेवे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू जेठानी, संतोष शामदासानी, नसरूद्दीन भामानी, कोरचीचे नगराध्यक्ष कमल खंडेलवाल, उपाध्यक्ष मुरलीधर सुंदरकर, विलास साळवे, महेश पापडकर, शरद मुळे, करूणा गणवीर, आशा राऊत, बबलू हुसैनी, पं.स. सदस्य चांगदेव फाये, विलास गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५५० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती. मात्र प्रकृतीच्या कारणावरून अनेकांनी रक्तदान केले नाही. देसाईगंज येथील सिंधी समाजाच्या वतीने निरंकारी मिशनचे बाबा हरदेव यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान होणारे हे पहिलेच रक्तदान शिबिर असल्याने या उपक्रमांची प्रसंशा करण्यात आली. शिबिरादरम्यान ३४२ पुरूष व ६९ महिलांनी रक्तदान केले. निरंकारी मंडळाच्या वतीने उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तसंक्रमण पेढीचे अधिकारी, ग्रामीण रूग्णालय देसाईगंज, उपजिल्हा रूग्णालय आरमोरी, कुरखेडा, प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूड, आष्टी, कोंढाळा येथील कर्मचारी तसेच संत निरंकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)बाबा हरदेव यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून तसेच इतर हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात येते. सर्वाधिक रक्तदान करणारे हे जिल्ह्यातील एकमेव मंडळ आहे. मंडळाच्या या सेवाभावी वृत्तीचे अनेकांनी कौतुक केले आहे. अशा प्रकारचे उपक्रम इतर सामाजिक संस्थांनी राबवावे, अशी आशा सुध्दा व्यक्त करण्यात येत आहे.