सिराेंचातील ४१ बेराेजगार बनले सुरक्षा रक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:21+5:30
जिल्हाभरात बारमाही राेजगाराचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे बऱ्याच युवकांना नाईलाज म्हणून शेतीची कामे करावी लागतात. शेतीच्या माध्यमातूनसुद्धा बारमाही राेजगार उपलब्ध हाेत नाही. परिणामी या युवकांना बेराेजगारीचा सामना करावा लागते. ही बाब लक्षात घेऊन सिराेंचाचे उपविभागीय पाेलीस अधिकारी प्रशांत रामेश्वरस्वामी यांच्या मार्गदर्शनात सिराेंचा येथे २० नाेव्हेंबर राेजी राेजगार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले.

सिराेंचातील ४१ बेराेजगार बनले सुरक्षा रक्षक
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिराेंचा : उपविभागीय पाेलीस अधिकारी कार्यालय सिराेंचा येथे पाेलीस विभागाच्या वतीने राेजगार मेळाव्याचे २० नाेव्हेंबर राेजी आयाेजन करण्यात आले हाेते. या मेळाव्यात सिराेंचा तालुक्यातील ४१ बेराेजगार युवकांना सुरक्षा रक्षकाची नाेकरी देण्यात आली.
जिल्हाभरात बारमाही राेजगाराचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे बऱ्याच युवकांना नाईलाज म्हणून शेतीची कामे करावी लागतात. शेतीच्या माध्यमातूनसुद्धा बारमाही राेजगार उपलब्ध हाेत नाही. परिणामी या युवकांना बेराेजगारीचा सामना करावा लागते. ही बाब लक्षात घेऊन सिराेंचाचे उपविभागीय पाेलीस अधिकारी प्रशांत रामेश्वरस्वामी यांच्या मार्गदर्शनात सिराेंचा येथे २० नाेव्हेंबर राेजी राेजगार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले.
या मेळाव्याला तालुकाभरातील युवकांनी हजेरी लावली. मेळाव्याला हैदराबाद येथील एएआयएमएस प्राेटेक्शन सर्विसेस कंपनीचे अधिकारी उपस्थित हाेते. या अधिकाऱ्यांनी ४१ तरूणांंना सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती दिली. या मेळाव्यासाठी सिराेंचाचे ठाणेदार अजय अहीरकर व इतर पाेलिसांनी सहकार्य केले.