शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रबी शिवार फेरीत ३५० शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 02:18 IST

कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, जिल्हा नाविन्यता परिषद, राष्ट्रीय

कृषी मेळावा : विविध पीक पद्धतीबाबत केले मार्गदर्शन; कृषी महाविद्यालयातील पिकांची पाहणी गडचिरोली : कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, जिल्हा नाविन्यता परिषद, राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स लिमिटेड, महाबिज व व्हीसीएमएफ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संशोधन केंद्र सोनापूर येथे कृषी मेळावा व रबी शिवार फेरीचे आयोजन २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान जिल्हाभरातील ३५० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. शिवार फेरीचे उद्घाटन आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनीय समारोहाला कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे, आत्माच्या उपसंचालक प्रिती हिरडकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, बाबुराव सारवे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना डॉ. प्रकाश पवार यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी प्रचलित पीक पध्दतीत आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे झाल्यास शेती निश्चितच फायद्याची ठरेल. नवीन संकल्पना, नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी बाबुराव सारवे यांनी सगुणा राईस पध्दतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी नेहमी तत्पर राहतात. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आवश्यक असल्यास त्यांनी प्रत्यक्ष कृषी केंद्रात येऊन सल्ला विचारावा, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. अमरशेट्टीवार, संचालन आर. डब्ल्यू. वाघमारे, आभार प्रा. डी. एन. अनोकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मनोहर इंगोले, डॉ. शुभांगी अलेक्झांडर, डॉ. डी. टी. उंद्रतवाड, डॉ. एच. एफ राठोड यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी) निवडक शेतकऱ्यांनाच बोलावल्याचा आरोप कृषी विज्ञान केंद्रात विविध मेळावे व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काही निवडकच शेतकऱ्यांना बोलाविले जाते. त्यामुळे या कार्यक्रमांचा लाभ काही निवडकच शेतकऱ्यांना मिळतो, असा एका प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी प्रत्येक मेळावा आयोजनाची माहिती वृत्तपत्रातून दिली जाते. त्यामुळे निवडक शेतकऱ्यांना कार्यक्रमाला बोलविले जाते. हा आरोप चुकीचा असल्याचे सांगितले.