शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

By admin | Updated: June 22, 2017 01:33 IST

पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने उन्हाळ्यातच नियोजन केले होते.

कृषी केंद्र चालकांकडे पुरेसा साठा : ख्ररेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने उन्हाळ्यातच नियोजन केले होते. त्यामुळे पेरणीच्या पूर्वीच जवळपास ३५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत. कृषी विभागाने ३४ हजार ५६५ क्विंटल बियाणांचे नियोजन केले होते. त्यापेक्षा अधिक बियाणांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही दुकानदाराला अधिकची किमत बियाणांसाठी मोजू नये असे आवाहन कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आले आहे. खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. यातील धान हे प्रमुख पीक आहे. सुमारे एक लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड होते. त्यामुळे सर्वाधिक बियाणे धान पिकाचे लागते. या बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना अधिकची किम्मत देऊन बियाणे खरेदी करावे लागते. त्याचबरोबर बियाणांचा काळाबाजार फोफावण्याची शक्यता राहते. बियाणांचा काळाबाजार थांबून शेतकऱ्यांची लूट थांबण्यासाठी कृषी विभागाच्या मार्फत नियोजन केले होते. पेरणीपूर्वीच बियाणे कृषी केंद्रांमध्ये दाखल होतील यादृष्टीने पाठपुरावा केला. त्यामुळे पेरणीपूर्वी मागणीपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्याच्या काही भागात पुरेसा पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. बियाणांचा सार्वजनिक कंपन्या व खासगी कंपन्या यांच्या मार्फत बियाणांचा पुरवठा केला जातो. कृषी विभागाने केलेल्या नियोजनाच्या अधिक प्रमाणात बियाणांचा पुरवठा झाला आहे. मात्र काही ठिकाणची माहिती कृषी विभागाला प्राप्त झालेली नाही. कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार कृषी विभागाने ३४ हजार ५६५ क्विंटल बियाणांचे नियोजन केले होते. त्यापैकी २३ हजार ४२९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा अधिक प्रमाणात पुरवठा झाला असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. कृषी विभागाने धान पिकाच्या बियाणांचा ३१ हजार ८३७ क्विंटल बियाणांचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते. त्याबरोबर सोयाबीन २ हजार १०० क्विंटल, तूर ३५० क्विंटल, कापूस १३९ क्विंटल, मका १२५ क्विंटल, उडीद ३ क्विंटल, तीळ ११ क्विंटल बियाणांचा पुरवठा होण्याच्या दृष्टिने नियोजन केले होते. मात्र यापेक्षाही अधिक प्रमाणात कृषी केंद्र चालकांकडे बियाणे उपलब्ध झाले आहेत. कृषी केंद्र व कृषी कार्यालयांमध्ये धान बियाणांसाठी शेतकऱ्यांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे. सध्या धान पेरणीलाही वेग आलेला आहे. खासगी कंपन्यांमध्ये लागली स्पर्धा पाच वर्षांपुर्वी बियाणांचा पुरवठा करणाऱ्या काही निवडकच कंपन्या होत्या. त्यामुळे या कंपन्यांची मनमानी चालत होती. त्यांच्याच हातात पुरवठ्याचे सुत्र असल्याने पुरवठा नियंत्रित करून भाववाढ करीत होते. बियाणे उपलब्ध होणार नाही अशी भिती शेतकऱ्यांमध्ये असल्याने दुकानदार सांगेल तेवढी किम्मत शेतकरी मोजण्यास तयार होत होता. यामध्ये शेतकऱ्यांची मोठी लूट होत होती. कंपन्यांचे बियाणे परवडत नसल्याने शेतकरी स्वत:कडचेच बियाणे वापरत होते. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. बियाणे विक्रीच्या क्षेत्रात अनेक कंपन्यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धेमुळे बियाणांचा पुरवठा वाढला आहे. त्याचबरोबर वाजवी किमतीत बियाणेसुद्धा उपलब्ध झाली आहेत. बियाणांचा होणारा काळाबाजार आता काही प्रमाणात थांबला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही दुकानदाराला अधिकची किम्मत देऊ नये. अधिकची किंमत मागीतल्यास याबाबतची तक्रार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे.