शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

३२४६ लेकींना मिळणार सायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 6:00 AM

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने मानव विकास मिशनच्या नियोजन अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून निधीची तरतूद केली. पहिल्या प्रस्तावातील २ हजार २३१ विद्यार्थिनींच्या सायकलीसाठी एकूण ७८ लाख ८ हजार ५०० रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी २ हजार २३१ सायकलीसाठी अग्रिम स्वरूपात प्रती सायकल दोन हजार रुपये प्रमाणे ४४ लाख ६२ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वळता केला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी : शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात अग्रिम रक्कम वळती

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वत:च्या गावात शाळा नसल्याने पाच किमीपर्यंतची पायपीट करून शिक्षण घेणाºया इयत्ता आठवी ते बारावीतील विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनअंतर्गत मोफत सायकली वितरणाची योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी दीडशेवर शाळांमधील ३ हजार २४६ विद्यार्थिनींना सायकली उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास निधीसह मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे आता सावित्रीच्या लेकींचा शिक्षणासाठीचा प्रवास सुकर होणार आहे.सन २०१९-२० या चालू शैक्षणिक सत्रात येत्या दोन महिन्यात मंजूर झालेल्या सर्व सायकली विद्यार्थिनींना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून त्या अनुषंगाने युध्दपातळीवर कार्यवाही सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने गतवर्षीच्या उन्हाळ्यात इयत्ता नववी, दहावी व बारावीत शिक्षण घेत असलेल्या व शाळेच्या गावी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिंना सायकल देण्यासाठीचे प्रस्ताव शाळास्तरावरून मागविले. प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून मंजुरीच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अधिनस्त मानव विकास मिशनच्या कार्यालयात सादर केले.यामध्ये १०० वर शाळांच्या विद्यार्थिनींच्या प्रस्तावाच समावेश होता. त्यानंतर जुलै, आॅगस्ट महिन्यात इयत्ता आठवी व अकरावीत असलेल्या विद्यार्थिनींना सायकली देण्याबाबतचा दुसरा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांनी प्रस्तावासंदर्भात पाठपुरावा केला.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने मानव विकास मिशनच्या नियोजन अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून निधीची तरतूद केली. पहिल्या प्रस्तावातील २ हजार २३१ विद्यार्थिनींच्या सायकलीसाठी एकूण ७८ लाख ८ हजार ५०० रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी २ हजार २३१ सायकलीसाठी अग्रिम स्वरूपात प्रती सायकल दोन हजार रुपये प्रमाणे ४४ लाख ६२ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वळता केला. शिक्षण विभागाच्या वतीने कार्यवाही करून हा निधी संबंधित शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वळता करण्यात आला. शाळांच्या वतीने काही विद्यार्थिनींच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दुसºया टप्प्यातील १ हजार १५ सायकलींसाठी प्रती सायकल ३ हजार ५०० रुपये प्रमाणे ३५ लाख ५२ हजार ५०० रुपयाच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी प्रदान केली आहे. सदर ३५ लाख रुपयाचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग झाला असून हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करण्यासाठीची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.दोन सत्रानंतर विद्यार्थिनींना मिळणार सायकलीशाळा व माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सायकलीबाबतचा प्रस्ताव व नियोजन आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. मात्र जिल्हा प्रशासनाकडून निधीसह प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने विद्यार्थिनींना सायकलचा लाभ देता आला नाही. सन २०१७-१८ व २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात पाच किमीपर्यंतची पायपीट करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकली मिळाल्या नाहीत. मात्र आता दोन्ही प्रस्तावास मंजुरी मिळाली असून निधी प्राप्त झाल्याने यंदाच्या शैक्षणिक सत्रात सावित्रीच्या लेकींच्या हाती नवीन सायकल दिसणार आहे.बस सुविधा नसलेल्या मार्गावर सोयमानव विकास मिशन अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवासाची सुविधा करण्यात आली असून जिल्हाभरात अनेक बसगाड्या धावत आहेत. ज्या ठिकाणी बसगाड्या नाही, अशा मार्गावरील विद्यार्थिनींसाठी सायकलीचा लाभ दिला जातो.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण