आरमोरी तालुक्यात ३२ घरांची पडझड
By Admin | Updated: July 13, 2016 02:11 IST2016-07-13T02:11:41+5:302016-07-13T02:11:41+5:30
गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आरमोरी तालुक्यात एकूण ३२ घरे व गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली.

आरमोरी तालुक्यात ३२ घरांची पडझड
अतिवृष्टीचा फटका : दीड लाखांचे नुकसान
आरमोरी/चामोर्शी : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आरमोरी तालुक्यात एकूण ३२ घरे व गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली. यामध्ये संबंधित नागरिकांचे सुमारे १ लाख ५५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
संततधार पावसामुळे आरमोरी तालुक्यात २९ घरांची अंशत: पडझड झाली. यामुळे १ लाख ३३ हजार रूपयांचे नुकसान झाले. तसेच गुरांचे दोन गोठे कोसळल्याने २२ हजार रूपयांचे नुकसान झाले. महसूल प्रशासनाच्या वतीने तलाठ्यांमार्फत मोका पंचनामे सुरू आहेत, अशी माहिती आरमोरीचे नायब तहसीलदार पित्तुलवार यांनी लोकमतला दिली आहे. (शहर प्रतिनिधी)