३० विद्यार्थिनींना मिळाला सायकलींचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST2021-05-18T04:37:33+5:302021-05-18T04:37:33+5:30
आष्टी येथील राजे धर्मराव हायस्कूलमध्ये परिसराच्या अनेक गावांतील विद्यार्थिनी ये-जा करतात. बाहेरगावावरून ये-जा करणाऱ्या मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात ...

३० विद्यार्थिनींना मिळाला सायकलींचा लाभ
आष्टी येथील राजे धर्मराव हायस्कूलमध्ये परिसराच्या अनेक गावांतील विद्यार्थिनी ये-जा करतात. बाहेरगावावरून ये-जा करणाऱ्या मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. शाळेचे प्राचार्य संतोष सरदार, पर्यवेक्षक डी.डी.रॉय यांच्या हस्ते मुलींना सायकलींचे वितरण करण्यात आले. शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला बाहेरगावावरून ३ ते ५ किमी अंतरावरून शाळेत येणाऱ्या ८ व ९वीच्या मुलींची यादी मागविली जाते. त्यानंतर, समाजकल्याण विभागाकडून मंजूर होऊन आलेल्या विद्यार्थिनींना सायकल वाटप केले जाते. आष्टी परिसरातील ठाकरी, इल्लूर, कुनघाडा, चपराळा, अनखोडा, मार्कंडा (कं.) आदी गावातील जवळपास ३०० विद्यार्थी आष्टी येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या गावात बसेसची समस्या असल्याने, विद्यार्थिनींना शाळेत येण्यास अडचण निर्माण होते. या वर्षी जवळपास ३० मुलींना सायकल मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे मुलींना शाळेत येण्यासाठी आता कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. कोविड १९च्या संसर्गामुळे शासनाच्या नियमानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला पालक व शिक्षक उपस्थित होते.