झेराॅक्ससाठी ३० किमींची पायपीट वाचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:37 IST2021-03-31T04:37:14+5:302021-03-31T04:37:14+5:30
विविध शासकीय याेजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जासाेबत आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्माचे प्रमाणपत्र, घर व शेतीशी संबंधित इतरही कागदपत्रांची झेराॅक्स जाेडाव्या लागतात ...

झेराॅक्ससाठी ३० किमींची पायपीट वाचली
विविध शासकीय याेजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जासाेबत आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्माचे प्रमाणपत्र, घर व शेतीशी संबंधित इतरही कागदपत्रांची झेराॅक्स जाेडाव्या लागतात तसेच शिक्षण घेत असलेल्या मुलांनाही विविध कागदपत्रांच्या झेराॅक्सची गरज भासते. याच झेराॅक्ससाठी ३५ कि.मी. अंतरावर असलेलेे तालुकास्थळ गाठावे लागत हाेते. वाहनांच्या साधनांचा अभाव यामुळे ये-जा करतानाच दिवस जात हाेता. कधी भामरागडातील वीजपुरवठा खंडित असल्यास झेराॅक्सही मिळत नव्हते. त्यामुळे त्याच ठिकाणी मुक्कामाने राहावे लागत हाेते तसेच झेराॅक्स नसल्याने काही नागरिक याेजनांपासून वंचितही राहत हाेते. ही बाब लक्षात घेऊन नागरगुंडा पाेलीस मदत केंद्रात झेराॅक्स मशीन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची पायपीट वाचण्यास मदत झाली आहे. पाेलीस स्टेशन म्हटले की तक्रारदार, साक्षीदार, पोलीस, आरोपी व त्यासंबंधीची हलचल असेच काहीसे चित्र आपल्या समोर उभे राहते.परंतु गडचिरोली जिल्हा पोलीस विभागातर्फे अनोखेच वेगळे चित्र आपणास पाहावयास मिळेल. नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अश्विन गजबिये यांच्या नेतृत्वात उपक्रम राबविले जात आहेत.