२८ अर्भक व बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:01:09+5:30

सिरोंचा तालुक्यात अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा व झिंगानूर अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत उपकेंद्र आहेत. अर्भक, बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी रूग्णालयात म्हणजेच संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला. यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करून गर्भवती महिलेची प्रसूती ही रूग्णालयातच करावी, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते.

28 Infants and children die | २८ अर्भक व बालकांचा मृत्यू

२८ अर्भक व बालकांचा मृत्यू

ठळक मुद्देबालमृत्यूचे प्रमाण कमी होईना : सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागातील वर्षभराची स्थिती

कौसर खान।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : अर्भक व बालमृत्यू रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असले तरी सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम व संवेदनशील भागात आरोग्य व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात बळकट झालेली नाही. तसेच आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव असल्याने या तालुक्यात अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण कायम आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात एकूण २८ अर्भक व बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
सिरोंचा तालुक्यात अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा व झिंगानूर अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत उपकेंद्र आहेत. अर्भक, बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी रूग्णालयात म्हणजेच संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला. यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करून गर्भवती महिलेची प्रसूती ही रूग्णालयातच करावी, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. मात्र सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागात अशिक्षितपणा, औषधोपचाराबाबत सांशक्ता तसेच पूजारांकडून उपचार करून घेण्यावर अनेकांचा प्रयत्न असतो. या सर्व कारणांमुळे सिरोंचा तालुक्यात अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.
० ते १० महिने वय असलेल्या बालकाला अर्भक म्हणतात. तर १ ते ५ वर्ष वय असलेल्याला बालक म्हणतात. अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७ अर्भक व ४ बालक असे एकूण ११ मुला-मुलींचा मृत्यू झाला. टेकडाताला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ अर्भक व ३ बालमृत्यू झाले. मोयाबिनपेठा केंद्रांतर्गत ३ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. आणि झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ अर्भक व एका बालकाचा मृत्यू झाला. ही सर्व माहिती तालुका आरोग्य यंत्रणेच्या सुत्राकडून मिळाली आहे.
एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षभराच्या कालावधीत एकट्या सिरोंचा तालुक्यात २८ अर्भक व बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

वर्षभरात गर्भवती महिलेचा मृत्यू नाही
जानेवारी २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत सिरोंचा तालुक्यात एकही गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला नाही. एकही महिला दगावली नाही, अशी माहिती सिरोंचा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर कन्नाके यांनी लोकमतशी बोलताना दिली. गर्भवती मातांना पोषण आहार, औषधी पुरवठा तसेच बालकांना ठरवून दिल्याप्रमाणे मासिक लसीकरण, परिचारिका व आशा स्वयंसेविकांमार्फत केले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत. मात्र बालक व अर्भक दगावणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे, असे ते म्हणाले.

Web Title: 28 Infants and children die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.