जिल्ह्यात एका मृत्यूसह नवीन २६ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:25 IST2021-06-17T04:25:17+5:302021-06-17T04:25:17+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ९७८ कोरोनाबाधित आढळले. त्यापैकी २८ हजार ९३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३११ सक्रिय बाधितांवर ...

26 new corona infected in the district with one death | जिल्ह्यात एका मृत्यूसह नवीन २६ कोरोना बाधित

जिल्ह्यात एका मृत्यूसह नवीन २६ कोरोना बाधित

जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ९७८ कोरोनाबाधित आढळले. त्यापैकी २८ हजार ९३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३११ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७३७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. बुधवारी झालेल्या एका मृत्यूमध्ये सिरोंचा तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.४ टक्के तर मृत्यूदर २.४६ टक्के झाला आहे.

नवीन २६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ७, अहेरी तालुक्यातील २, आरमोरी ४, भामरागड तालुक्यातील १, चामोर्शी तालुक्यातील ४, धानोरा तालुक्यातील ३, मुलचेरा तालुक्यातील १, सिरोंचा तालुक्यातील २ आणि देसाईगंज तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या २४ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ११, आरमोरी १, चामोर्शी ३, एटापल्ली १, सिरोंचा ३ तसेच देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे.

Web Title: 26 new corona infected in the district with one death