२६ बाधित तर २९ काेराेनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:38 IST2021-03-17T04:38:16+5:302021-03-17T04:38:16+5:30

एकूण बाधितांची संख्या ९ हजार ९३२ झाली आहे. त्यापैकी ९ हजार ५८४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या २४० ...

26 interrupted and 29 free | २६ बाधित तर २९ काेराेनामुक्त

२६ बाधित तर २९ काेराेनामुक्त

एकूण बाधितांची संख्या ९ हजार ९३२ झाली आहे. त्यापैकी ९ हजार ५८४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या २४० जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५० टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २.४२ टक्के तर मृत्यू दर १.०९ टक्के झाला. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कॅम्प एरिया २, स्थानिक २, प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला १, रेड्डी गोडाऊन चौक ४, गांधी वार्ड २, पेनगुंडा १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये चांदागड २, मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर १, वडसा तालुक्यातील सीआरपीएफ कॅम्प १, सावंगी १, चामोर्शी तालुक्यातील आष्टी १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक १,अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ३, संत मानव दयाल आश्रम शाळा ४ जणांचा समावेश आहे.

Web Title: 26 interrupted and 29 free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.