‘नवसंजीवनी’तील २५३ गावे मोफत धान्यास मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:00:35+5:30

लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत देण्यात आलेले प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य (तांदूळ आणि गहू) आता जुलै ते सप्टेंबर या काळासाठीही देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या नियमित नियतनासोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या ५ किलो मोफत धान्याचा लाभ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मिळणे गरजेचे आहे.

253 villages in Navsanjeevani will get free foodgrains | ‘नवसंजीवनी’तील २५३ गावे मोफत धान्यास मुकणार

‘नवसंजीवनी’तील २५३ गावे मोफत धान्यास मुकणार

ठळक मुद्देअनेक गावे संपर्काबाहेर : ७० हजार नागरिक राहणार वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनच्या काळामुळे गोरगरीब नागरिकांच्या दैनंदिन मिळकतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना आणखी तीन महिने मोफत धान्य देण्याचा आदेश केंद्र सरकारने काढला. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील २५३ गावांमध्ये आता धान्याचे वाहन पोहोचणेच शक्य नसल्यामुळे त्या गावातील ७० हजार नागरिकांना तूर्त तरी या मोफत धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
जून महिन्यात पावसाला सुरूवात झाली की जिल्ह्यातील धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी आणि भामरागड या सहा तालुक्यातील २५३ गावांचा संपर्क तुटतो. अनेक नदी-नाल्यांवर पूल नसल्यामुळे कोणतेही वाहन त्या गावांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे नवसंजीवनी योजनेअंतर्गत त्या गावांमधील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील ७० हजार १३४ नागरिकांसाठी मे महिन्यातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा धान्यसाठा गावात पोहोचवून दिला जातो. यावर्षीही ते धान्य त्या गावांशी संबंंधित १२७ रास्त भाव दुकानांमध्ये पोहोचवण्यात आले.
दरम्यान लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत देण्यात आलेले प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य (तांदूळ आणि गहू) आता जुलै ते सप्टेंबर या काळासाठीही देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या नियमित नियतनासोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या ५ किलो मोफत धान्याचा लाभ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मिळणे गरजेचे आहे. पण पावसाळा सुरू झाल्यामुळे नवसंजीवनी योजनेतील २५३ गावांना आता ते ५ किलो मोफत धान्य कसे पोहोचविणार, अशी मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर प्रशासन कशा पद्धतीने तोडगा काढते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
उशिरा आलेल्या आदेशामुळे अडचण
नवसंजीवनी योजनेतील २५३ गावांना पावसाळा सुरू होण्याआधीच चार महिन्यांचा धान्य पुरवठा झाला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत तीन महिने मोफत धान्य वाटपाचा आदेश जुलैच्या दुसºया आठवड्यात मिळाला. त्यामुळे त्या २५३ गावांना आता हे धान्य पुरवणे कठीण होणार आहे. तरीही शक्य तितक्या गावांना धान्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी व्ही.के.सहारे यांनी सांगितले.

Web Title: 253 villages in Navsanjeevani will get free foodgrains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.